Fact Check: भारतीय पासपोर्टमधून राष्ट्रीयत्वाचा कॉलम काढण्यात आलाय? PIB ने केला सत्याचा खुलासा

या व्हॉट्सअॅप मेसेज मध्ये भारत सरकारने पासपोर्टमधून राष्ट्रीयत्वाचा पर्याय काढण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.

Fake Claim In WhatsApp Message (Photo Credits: Twitter/PIBFactCheck)

सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून व्हायरल होणाऱ्या फेक न्यूज (Fake News) मध्ये अजून एका व्हॉट्सअॅप मेसेजची (WhatsApp Message) भर पडली आहे. या व्हॉट्सअॅप मेसेज मध्ये भारत सरकारने पासपोर्ट (Passport) मधून राष्ट्रीयत्वाचा कॉलम काढण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. हा मेसेज वेगाने पसरत असून यामुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या मेसेज मागील सत्याचा उलघडा केला आहे.

हा मेसेज फेक असल्याचे पीआयबीने सांगितले आहे. "मेसेज मधील दावा खोटा असून भारत सरकारने पासपोर्ट संबंधित अशा प्रकराचा कोणताही आदेश जारी केलेला नाही," असे पीआयबीने आपल्या ट्विटमधून स्पष्ट केले आहे. (Fact Check: यावर्षी दहावी, बारावीची परीक्षा उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांना सरकारी नोकरीत मान्यता नाही? पीआयबीने दिली 'अशी' माहिती)

Fact Check By PIB: 

यापूर्वी देखील विविध प्रकारच्या फेक न्यूज समोर आल्या आहेत. यातून होणारी दिशाभूल आणि फसवणूक टाळण्यासाठी तथ्य तपासणीशिवाय सोशल मीडियावरील कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही मेसेज पाहिल्या किंवा वाचल्यावर त्यामागील सत्य जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वासही ठेवू नका आणि तो फॉरवर्ड करणेही टाळा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif