Coronavirus Hoax Message: कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी 5 मार्च पासून भरपगारी सुट्टी; जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेज मागील सत्य!
चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरस पसरला आणि त्यानंतर याच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल प्रचंड दहशत पसरली आहे.
चीनमधील वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची आणि बळींची संख्या वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल प्रचंड दहशत पसरली आहे. चीनमध्ये कोरोना बाधित मृतांचा आकडा 2,953 वर पोहचला आहे. तर कमीत कमी 60 देशातील लोक कोरोनाने संक्रमित झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतासह महाराष्ट्रातही कोरोना बाधित संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर देशभरात कोरोना व्हायरसची भीती पसरत असून 5 मार्च 2020 पासून कर्मचार्यांना दोन आठवड्यांची भरपगारी रजा मिळणार आहे, अशा आशयाचा एक मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. हा मेसेज वाचण्यासाठी आनंददायी वाटत असला तरी यात नक्की तथ्य आहे का? हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. तर व्हॉटसअॅपवर फिरत असलेला हा मेसेज फेक फॉरवर्ड्स पैकी एक आहे. यात काहीही तथ्य नाही.
नोएडा येथील दोन शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने समोर आले आहे. त्यामुळे त्या जागा स्वच्छ करण्यासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. कारण विद्यार्थ्यांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. मात्र या बातमीनंतर देशभरात कोरोनाची दहशत अधिकच वाढली असून भीतीपोटी नागरिक गोंधळून जात आहेत. त्याच दरम्यान व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या या फेक मेसेजने डोके वर काढले आहे. त्यामुळे 5 मार्चपासून भरपगारी सुट्टी मिळणार, या चर्चांना उधाण आले आहे. (Travel advisory on COVID-19: भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी नवी नियमावली जारी)
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना 5 मार्चपासून दोन आठवड्यांची भरपगारी सुट्टी देण्यात येणार असून त्यानंतर ऑफिसेस कामासाठी ओपन केले जातील. असा मेसेज असून त्याखाली एक लिंक देण्यात आली आहे. हा मेसेज म्हणजे निव्वळ फसवणूक असून याद्वारे युजर्सची चेष्टा करणाऱ्या प्रयत्न केला जात आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर एक गोरिला 'मिडल फिंगर' दाखवत असल्याचे चित्र ओपन होते.
सर्वप्रथम कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले अगदी तेव्हापासूनच सोशल मीडियावर फेक मेसेजस आणि व्हिडिओजचे पेव फुटले आहे. त्यामुळे युजर्संना अधिक गोंधळात टाकणाऱ्या आणि भीती निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे.