Viral Video: अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर दारूच्या नशेत तरुणाने कारच्या खिडकीला लटकून चालवली गाडी; चालकाला अटक, पहा व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर मद्यधुंद ड्रायव्हरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कार चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना कारच्या खिडकीला लटकलेला दिसत आहे.

Drunk youth hangs on car window (PC - X/@Mumbaikhabar9)

Viral Video: मद्यपान करून वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. रस्त्यांवर सर्वत्र यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. पण तरीही अनेकजण या सूचनेकडे दुर्लक्ष करतात. सध्या सोशल मीडियावर मद्यधुंद ड्रायव्हर (Drunk Driver) चा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये कार चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना कारच्या खिडकीला लटकलेला (Drunk Youth Hangs on Car Window) दिसत आहे. कार चालकाचे हे कृत्य इतके भयावह होते की, त्यांच्या या कृत्रीमुळे रस्त्यावरील सर्वांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती.

व्हिडिओमध्ये हा तरुण दारूच्या नशेत असल्याचे दिसून येत आहे. तो कारच्या खिडकीला लटकून जीवाची पर्वा न करता गाडी चालवत आहे. कार चालकाच्या या कृतीमुळे त्याचा जीव तर धोक्यात आलाच पण रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वांसाठीही हा मोठा धोका होता. अखेर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुसऱ्या वाहनाला धडकली. ही संपूर्ण घटना रस्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा -Chandrapur: पुराच्या पाण्यात कार गेली वाहून , पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ)

पहा व्हिडिओ - 

मद्यधुंद कार चालकाला अटक -

व्हायरल झालेला व्हिडिओ मंगळवारी रात्री 12.15 वाजता मुंबईतील अंधेरी येथील घाटकोपर लिंक रोडवर शूट करण्यात आला. सूरज साव असे आरोपीचे नाव आहे. दारूच्या नशेत सूरजने गाडीला धडक दिली. या व्हिडिओची दखल घेत मुंबई पोलिसांनी सूरजविरोधात एफआयआर नोंदवून त्याला अटक केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मुंबई न्यूज नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement