Dr. Michiaki Takahashi Birthday Google Doodle: Chicken Pox Vaccine ची निर्मिती करणार्‍या डॉ.मिकियाकी ताकाहाशी यांच्या 94व्या जन्मदिनानिमित्त खास गूगल डूडल

मिकियाकी ताकाहाशी यांच्या जन्मदिनी त्यांच्या कांजण्यावरील लसीच्या निर्मितीला गूगल डूडलच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले आहे.

मिकियाकी ताकाहाशी । PC: Google Homepage

आज गूगलच्या होमपेजवर वर झळकणारं डूडल हे मिकियाकी ताकाहाशी( Dr Michiaki Takahashi) यांच्या 94 व्या जन्मदिनानिमित्त झळकत आहे. Dr Michiaki Takahashi हे जपानी virologist आहेत. त्यांनी कांजण्या अर्थात Chickenpox वरील पहिली लस शोधली होती. जगभरात या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी विकसित केलेली लस प्रभावी ठरली.

दरम्यान आजचं गूगल डूडल जपानचा गेस्ट आर्टिस्ट Tatsuro Kiuchi ने साकारलं आहे. 'त्याला हे शिकता आले की लस अत्यंत संसर्गजन्य रोगावर मात करू शकतात आणि जग बदलू शकतात.' या विचारावर आधारित डूडल साकारलं आहे.

Dr Michiaki Takahashi यांचा जन्म 1928 मधील आहे. त्यांनी Osaka University मधून वैद्यकीय शिक्षण घेतलं. Research Institute for Microbial Disease त्यांनी 1959 मध्ये जॉईन केले. तेथे Measles आणि Polio Viruses चा अभ्यास केला. 1963 साली त्यांनी अमेरिकेच्या Baylor College मधून रिसर्च फेलोशीप स्वीकारली.

Takahashi च्या मुलाला कांजण्यांचा गंभीर त्रास झाला होता. त्यामधून त्यांचा या झपाट्याने पसरणार्‍या आजाराच्या औषधाला शोधण्यासाठीचा प्रयत्न सुरू झाला. त्याने मनुष्य आणि प्राण्यामध्ये लाईव्ह पण कमजोर चिकनपॉक्स वायरस टाकून varicella vaccine निर्माण केली. या लसीने सकारात्मक परिणाम दाखवले. नक्की वाचा: Dr. Kamal Ranadive Google Doodle: कमल राणादीव यांच्या 104 व्या जन्मदिनानिमित्त खास गूगल डूडल .

1986 मध्ये Research Foundation for Microbial Diseases ने कांजण्याविरूद्ध लढण्यासाठी जपान मध्ये ही लस वापरण्यास सुरूवात केली. varicella vaccine ही त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली एकमेव लस होती.