Desi Jugaad Video: वाफ घेण्यासाठी तरुणाने लढवली अनोखी शक्कल, प्रेशर कुकरला बनवले स्टिमर

एका भारतीय तरुणाचा वाफ घेत असल्याचा एक व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियात व्हायपल होत आहे. या व्हिडिओतून तरुणाने वाफ घेण्यासाठी देसी जुगाड केल्याचे दिसून आले आहे.

देसी जुगाड़ (Photo Credits: Youtube)

Desi Jugaad Video: एका भारतीय तरुणाचा वाफ घेत असल्याचा एक व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियात व्हायपल होत आहे. या व्हिडिओतून तरुणाने वाफ घेण्यासाठी देसी जुगाड केल्याचे दिसून आले आहे. कुकरच्या शिटीच्या येथे त्याने एक लांब पाइप लावला असून त्यामधून तो वाफ घेत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे श्वास घेण्यास बहुतांश जणांना त्रास होत असल्याने ते वाफ घेत आहेत. ग्रामीण विभागात वीज आणि स्टिमर नसल्याने अधिकाधिक लोक देसी जुगाड करुन वाफ घेत आहेत. यापूर्वी सुद्धा देसी जुगाड करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी लोक विविध उपाय करत असल्याचे ही समोर येत आहे.(Karnataka: चिखलात अडकलेल्या हत्तीचा थोडक्यात बचावला जीव; वन अधिकाऱ्यांनी असे केले रेस्क्यू  Watch Viral Video)

व्हिडिओमध्ये एक तरुण देसी जुगाड करत असल्याचे दिसून येत आहे. तुम्ही पाहू शकता तो प्रेशर कुकरचा वापर करुन वाफ घेत आहे. कुकरची शिटी 90 डिग्री असलेल्या पाइपमध्ये बदलण्यात आली आहे. तर बाजूस वाफ घेण्यासाठी शॉवरचे टोक लावल्याचे दिसून येत आहे. यामुळे तो अगदी सहज वाफ घेऊ शकत आहे.(पुणे: रस्त्यावरील कुत्र्याला लाथाडणे रिक्षाचालकाला पडले महागात, पाहा पुढे काय घडले)

भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या विरोधात लढा दिला जात आहे. तर काहीजण घरगुती पद्धतीने वाफ घेण्यासाठी देसी जुगाड करत आहेत. स्टिम थेरपी नाकपुड्या खोलण्यासाठी मदत करतात. तसेच सर्दी, ताप, साइनस सारख्या आजारांपासून थोड बरं वाटण्यासाठी मदत होते. तसेच घशाला सुद्धा आराम देण्यासह सूज कमी होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement