Coronavirus: लॉकडाउनमुळे लग्नाची तारीख पुढे ढकल्याने नववधूसाठी मित्रांनी वर्चुअल संगीत पार्टीचे केले आयोजन, पाहा व्हायरल Video
सोशल डिस्टेंसमुळे कोणत्याही कार्यक्रमास बंदी आहे. लॉकडाउन दरम्यान एका जोडप्याची संगीत पार्टीने सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यूजर्स या वर्चुअल संगीत पार्टीचा जोरदार आनंद घेत आहेत. जोडप्याचे मित्रांनी ही संगीत पार्टी आयोजित केली होती.
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशात लॉकडाउन (Lockdown) आहे. सोशल डिस्टेंसमुळे कोणत्याही कार्यक्रमास बंदी आहे. अशा स्थितीत ज्या जोडप्याचे लग्न ठरलेले होते त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बर्याच ठिकाणी लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहे, तर बरेच लोक ऑनलाईन लग्न करत आहेत. लॉकडाउन दरम्यान एका जोडप्याची संगीत पार्टीने सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यूजर्स या वर्चुअल संगीत पार्टीचा (Virtual Sangeet Party) जोरदार आनंद घेत आहेत. जोडप्याचे मित्रांनी ही संगीत पार्टी आयोजित केली होती. या जोडायचे या आठवड्यात लग्न होणार होतं पण सध्याची स्थिती पाहता लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. तथापि, जोडप्याच्या मित्रांनी त्यांना निराश केले नाही आणि त्यांच्या घरी दोघांसाठी एक व्हर्च्युअल पार्टीची योजना बनविली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि या सर्व मित्रांनी वधू-वरसाठी केलेल्या सुंदर वर्चुअल संगीताचे कौतुक केले आहे. (Saree Challenge: Skydiver शितल महाजन यांचे साडी चॅलेंज, फोटो पाहू फॉलोअर्स थक्क)
व्हायरल होणारा व्हिडिओ ट्विटर यूजर, @gazalbawa यांनी शेअर केला आहे. “आमच्या लग्नात या शनिवार आणि रविवारी होत नसल्याने आमच्या मित्रांनी एक #BMMani व्हर्च्युअल संगीत पार्टी' थ्रो केली! आपलं इतकं प्रेम पाहून आमची अंतःकरणे प्रेमाने भरली आहेत, आमचा दिवस बनवला,” असं तिने व्हिडिओ कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. पाहा व्हिडिओ:
ट्विटरसह आम्हीही याच्या प्रेमात पडलो आहोत!
धन्य...
अविश्वसनीय!
खरं ते!
हा एक आश्चर्यकारक गेस्चर आहे. ही वेळ आपल्या सर्वांसाठी कठीण आहे. पण आपण सर्वांना यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे