डोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये
मुंबईतील डॉ. चंद्रशेखर छावन या ऑप्टोमेट्रीस्टने अशा प्रकारच्या लेन्सेस तयार केल्या आहेत.
दिवसागणिक बदलत जाणारी इंडस्ट्री म्हणून आज फॅशनच्या दुनियेकडे पहिले जाते. कपड्यांसोबत नाविन्यपूर्ण अलंकारही आज ग्राहकांना आकर्षित करून घेत आहेत. त्यात सोने तर भारतीयांच्या विशेष पसंतीचे. संपूर्ण शरीरावर सोन्याचा वापर विविध प्रकारे केला गेला आहे मात्र डोळ्यांमध्ये सोने अजून वापरले नाही. तर आता डोळ्यांची सुंदरता वाढवण्यासाठी गोल्ड प्लेटेड कॉन्टॅक्ट लेन्सचा आविष्कार बाजारात आला आहे. मुंबईतील डॉ. चंद्रशेखर चव्हाण (Dr. Chandrashekhar Chawan) या ऑप्टोमेट्रीस्टने अशा प्रकारच्या लेन्सेस तयार केल्या आहेत.
चंद्रशेखर यांच्या या लेन्सची फॅशन इंडस्ट्रीमध्ये चांगलीच क्रेझ असलेली दिसून येत आहे. फक्त सोनेच नाही तर चांदी आणि हिऱ्यांचाही वापर कॉन्टॅक्ट लेन्ससमध्ये केला जाऊ शकतो हे चंद्रशेखर यांनी दाखवून दिले आहे. या लेन्समध्ये सोन्याचे पाणी चारही बाजुंनी लावण्यात आले आहे त्यामुळे या लेन्सेस सोन्यासारख्याच चमकतात. मुंबईची मॉडेल मृणाल गायकवाड अशा प्रकारच्या लेन्सेस 4 महिन्यांपासून वापरत आहे मात्र तिला कोणताही त्रास होत नसल्याचे तिने सांगितले आहे. (हेही वाचा: एक्सपायर झालेली सौंदर्यप्रसाधने फेकून देण्याऐवजी असा करा पुन्हा वापर)
ग्राहकांना हव्या त्या प्रकारे, सोन्यसह चांदी आणि हिऱ्यांचाही वापर करून लेन्सेस तयार करून दिल्या जात आहेत. कदाचित जगात पहिल्यांदाच सोन्याचा वापर कॉन्टॅक्ट लेन्समध्ये केला जात असेल, असे डॉक्टर चंद्रशेखर छवन यांनी म्हटले आहे. या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्सेसचे पेटंटही त्यांनी घेऊन ठेवले आहे. या लेन्सची किंमत जवळजवळ 8 लाख इतकी आहे.