Penis Plants! पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट प्रमाणे दिसणार्या पेनिस प्लांट बद्दल महिलांमध्ये क्रेझ; पर्यावरण मंत्रालयाकडून 'हे' आवाहन
नैसर्गिक संसाधनांवर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद, परंतु त्यांची कापणी करू नका, वाया घालवू नका.'
पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट प्रमाणे दिसणार्या Penis Plant बाबत सध्या महिलांमध्ये क्रेझ वाढत आहे. कंबोडियामध्ये सध्या या प्रकारामुळे सरकारही चिंतेमध्ये आहे. सरकार कडून दुर्मिळ अशा या Carnivorous Penis Plants पासून लोकांना दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कंबोडियन वेबसाईट खमेर टाइम्सच्या माहितीनुसार, फेसबूक वर 3 महिलांनी या रोपट्यासोबत पोझ देत फोटो शेअर केला होता. यानंतर कंबोडिया पर्यावरण मंत्रालयाने या Penis Plant पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
कंबोडिया पर्यावरण मंत्रालयाने 11 मे दिवशी केलेल्या फेसबूक पोस्ट मध्ये लिहलं, 'ते जे करत आहेत ते चुकीचे आहे आणि कृपया भविष्यात असे करू नका. नैसर्गिक संसाधनांवर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद, परंतु त्यांची कापणी करू नका, वाया घालवू नका.'
काही न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ही रोपटी Nepenthes holdenii आहेत. मात्र मूळात ती Nepenthes bokorensis प्रजातीची आहेत. Jeremy Holden नावाच्या एका फ्रीलान्सर वन्यजीव फोटोग्राफरने पहिल्यांदा Nepenthes holdenii चा शोध लावला होता.
Holdenii और N. bokorensis ही दोन्ही दिसायला सारखीच आहेत. दोन्ही फक्त जवळच्या पर्वतरागांवर आढळतात, ज्यामुळे अनेकांचा सहज गोंधळ होतो. जरी एन. होल्डेनी या दोन प्रजातींपैकी दुर्मिळ आहे आणि ती कुठे शोधायची हे फक्त काही संशोधकांनाच माहीत आहे. दक्षिण-पश्चिम कंबोडियाचे होल्डन म्हणाले की ही वनस्पती वेलचीच्या पर्वतांमध्ये काही गुप्त ठिकाणी वाढते. हे देखील नक्की वाचा: Longest Penises in World: भारतीय पुरुषांचे लिंग सरासरी अमेरिकन पुरुषांपेक्षा जास्त असते का? जगभरातील पुरुषांच्या जननेंद्रियाच्या आकारांची क्रमवारी लावणारे संशोधन प्रकाशित .
दरम्यान ही फोटोजनिक रोपट्यांना नुकसान पोहचवल्याप्रकरणी चेतावणी देणारा पहिला प्रकार नाही. मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या माहितीनुसार, जुलै 2021 मध्येही पर्यटकांना एन बोकोरेंसिस आणि एन होल्डेनी ला हात न लावण्याचा सल्ला दिला होता. यामुळे दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे.