Dead Ants In Samosa Video Viral: समोसा कसला! मेलेल्या मुंग्यांचे वारुळच; दिल्ली येथील महाविद्यालयातील व्हिडिओ व्हायरल

ज्यामध्ये ग्राहकाला समोसा (Samosa) देण्यात आला आहे. त्या समोशामध्ये चक्क मेलेल्या मुंग्या (Samosa With Ants) पाहायला मिळत आहेत.

Samosa With Ants | (Photo credit: archived, edited, representative image)

खाद्यपदार्थांमध्ये किडे, मुंग्या (Ants), झुरळ मिळण्याच्या घटना नव्या नाहीत. विमान, रेल्वे आणि उपहारगृहांतील अनेक व्हिडिओ वेळोवेळी पुढे येतात. दिल्ली येथील एका कॉलेज उपहारगृहातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ग्राहकाला समोसा (Samosa) देण्यात आला आहे. त्या समोशामध्ये चक्क मेलेल्या मुंग्या (Samosa With Ants) पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, समोशाला मुंग्या लागणे समजू शकते पण हा प्रकार म्हणजे समोशात मुंग्यांचे वारुळच असल्याचे दिसते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियातून (Social Media) संताप व्यक्त होतो आहे. तसेच, कॅन्टीनच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मुंग्यांनी भरलेला समोसा

दिल्लीतील कॉलेज कॅन्टीनमधील घटनेचा व्हिडिओ सुरुवातीला @du__india या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, मेलेल्या मुंग्यांनी भरलेला समोसा दिल्ली विद्यापीठाच्या दयाल सिंग कॉलेजच्या कॅन्टीनमधून आला आहे. समोश्यात असलेले मुंग्यांचे रिवान पाहून सोशल मीडियावर जोरदार संताप व्यक्त होऊ लागला आहे. अशा प्रकारचे खराब अन्न पुरविणाऱ्या उपहारगृह चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली जात आहे. (हेही वाचा, Candle Vada Pav Viral Video: मेणबत्ती वडापाव! खयचा नाही, फक्त पाहायचा आणि पेटवायचा; आहे ना गंमत? मग घ्या जाणून)

भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीत वाढ

दरम्यान, सोशल मीडियावर गदारोळ होऊनही दिल्ली विद्यापीठाने या प्रकरणावर मौन बाळगले आहे. त्यामुळे नेटीजन्स आणखीच आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमध्ये संमिश्र भावना पाहायाला मिळत आहे. अनेकांनी भेसळयुक्त अन्नाच्या घटनांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी उपहारहृाची ताततीडने स्वच्छता करावी आणि खाद्यपदार्थांची गुणवत्ता वाढवावी असे म्हटले आहे.

एका वापरकर्त्याने केवळ उपहारगृह चालकच नव्हे तर त्यास विद्यापीठ आवारात व्यवसाय करण्याची परवानगीच कशी मिळाली याची चौकशी व्हावी असे म्हटले आहे. दुसऱ्या एका वापरकर्त्याने फिरकी घेत म्हटले आहे की, या समोशामध्ये मला चुकीचे काहीच दिसत नाही. उलट त्यात मला अधिक प्रथिने (प्रोटीन्स) दिसत असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, खाण्याची गाजरे पायाने धतली, व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियातून संताप)

व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by DU INDIA📍DELHI UNIVERSITY ❤️🦋 (@du__india)

उपहारगृहांमधील अशा धक्कादायक घटनांचे व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. वर्षी, ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून असाच एक भयानक व्हिडिओ समोर आला होता.ज्यामध्ये कॅम्पस खानावळीमध्ये खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छतेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे पुढे आले होते. या ठिकाणी एका पातेल्यामध्ये बटाटे कुस्करण्यासाठी कर्मचारी हाता ऐवजी पायांचा वापर करत असल्याचे पुढे आले होते. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता आणि त्या वेळीही नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.