व्हेल माशाने माणसाला जीवंत गिळले, 40 सेकंदानंतर उलटी करुन काढले बाहेर
येथील एका व्यक्तीला भल्यामोठ्या माश्याने गिळले होते. मात्र जवळजवळ 40 सेकंदापर्यंत तो व्यक्ती व्हेल माशाच्या तोंडातच होता.
अमेरिकेत मॅसाच्युसेट्स मधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीला भल्यामोठ्या माश्याने गिळले होते. मात्र जवळजवळ 40 सेकंदापर्यंत तो व्यक्ती व्हेल माशाच्या तोंडातच होता. पण नंतर व्हेल माशाने उलटी करत त्याला तोंडातून बाहेर फेकले. मायकल पॅकर्ड असे व्यक्तीचे नाव असून तो 56 वर्षाचा आहे. तो गेल्या 40 वर्षांपासून लॉबस्टर डाइव्हरचे काम करतो. समुद्रातील विविध जीव पकडतो आणि नंतर मार्केटमध्ये विक्री करतो. शुक्रवारी सकाळी Harring Cove Beach मध्ये तो जवळजवळ समुद्राच्या 35 फूट खाली गेला होता.(प्रशिक्षित हत्तीच्या मदतीने जंगली हत्तीला केले नियंत्रित; पहा Viral Video)
न्यूयॉर्क पोस्टच्या मते, ही घटना सकाळी 8 वाजल्याच्या सुमारासची आहे. पॅकर्ड याने म्हटले की, मला तर प्रथम धक्काच बसला. त्यानंतर सगळे काही अंधारासारखे जाले. मला कळत होते की मला हलता येत आहे. त्याचसोबत व्हेल मासा आपल्या तोंडातल्या तोंडात जोर लावत असल्याचे सुद्धा जाणवत होते. आधी त्याला वाटले की. त्याच्यावर एखाद्या शार्कने हल्ला केला आहे.
पहिल्यांदा मला विश्वासच बसत नव्हता की मी व्हेल माशाच्या तोंडातून बाहेर कसा आलो असे पॅकर्ड याने म्हटले. त्याचसोबत कोणत्याही जखमा सुद्धा झाल्या नसल्याचे त्याने सांगितले. नंतर पॅकर्ड याचा मित्र Josiash Mayo ने त्याची मदत केली. त्याला समुद्रातून सुखरुप बाहेर काढले. नंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची बिबट्याने 'अशी' केली शिकार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद Watch Video)
व्हेल संबंधिक जाणकर Jooke Robbins यांनी असे म्हटले की, व्हेल मासा हे लहान असेल किंवा हे एका चुकीमुळे सुद्धा झाले असेल. त्यामुळेच व्हेलने त्याला तोंडातून बाहेर फेकले. पण अशा पद्धतीची घटना कधी पाहिली किंवा ऐकली सुद्धा नसल्याचे तिने म्हटले.