Man Dies of Cardiac Arrest During Cricket Match: पंजाबच्या फिरोजपूर परिसरात क्रिकेट खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हरजीत सिंग यांचे सहकारी त्याच्या मदतीसाठी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतात आणि त्यांना सीपीआर देतात. परंतु त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत हरजीत यांचा मृत्यू झाला होता.
Man Dies of Cardiac Arrest During Cricket Match: पंजाबमधील फिरोजपूरमधील गुरुहर सहाय शहरात स्थानिक क्रिकेट सामन्यात षटकार मारल्यानंतर एका व्यक्तीचा काही क्षणातच हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack ) मृत्यू झाला. डीएव्ही स्कूलच्या मैदानावर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ मोबाईल फोनवर रेकॉर्ड करण्यात आला. हरजीत सिंग, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हरजीत सिंग हा व्यवसायाने सुतार होता. व्हिडिओमध्ये सिंग पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. षटकार मारल्यानंतर तो थोडा वेळ विश्रांती घेत असल्याचे दिसून येते. तथापि, तो छातीत दुखत असल्याची तक्रार करतो आणि जमिनीवर कोसळतो.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हरजीत सिंग यांचे सहकारी त्याच्या मदतीसाठी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतात आणि त्यांना सीपीआर देतात. परंतु त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत हरजीत यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हेही वाचा - Doctor Beats Adopted Daughter With Stick: शिमलामध्ये डॉक्टराची 10 वर्षांच्या दत्तक मुलीला काठीने बेदम मारहाण (Watch Video))
क्रिकेट खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू -
पंजाब के फिरोजपुर में छक्का मारते ही बल्लेबाज को आया अचानक हार्ट अटैक
पिच पर गिरकर वही हो गयी 10 सेकेंड के अन्दर तत्काल मौत pic.twitter.com/58exX7FSJO
— ऋषभ त्यागी (वशिष्ठ) (@RISHABH79RAAZ) June 29, 2025
दरम्यान, दुसऱ्या एक घटनेत कुस्तीच्या लढतीदरम्यान बेशुद्ध पडल्याने कुस्तीगीरचा मृत्यू झाला होता. जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील डिंगा अंब भागात आयोजित वार्षिक दंगल स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. सोनू नावाचा कुस्तीगीर लढाईदरम्यान बेशुद्ध पडला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2025 03:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

