Hindu Mahasabha Worker Offers Gangajal At Taj Mahal Tomb: ताजमहालमध्ये विचित्र घटना; हिंदू महासभेच्या कार्यकर्त्याने समाधीवर अर्पण केले गंगाजल (Watch Video)

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती गुप्तपणे कबरीवर पाणी टाकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक सुरक्षा कर्मचारीही दिसत आहे. मात्र, ती व्यक्ती कबरीवर पाणी टाकत असताना त्याला कोणीही अडवत नाही.

Hindu Mahasabha Worker Offers Gangajal At Taj Mahal Tomb (PC - X/@SachinGuptaUP)

Hindu Mahasabha Worker Offers Gangajal At Taj Mahal Tomb: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल (Taj Mahal) मध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्याने (Hindu Mahasabha Worker) गुपचूप कबरीवर गंगाजल अर्पण केले. अहवालानुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या जवानांनी विनेश आणि श्याम नावाच्या दोन लोकांना कबरीवर पवित्र गंगाजल अर्पण केल्याबद्दल ताब्यात घेतले आहे. ताजमहालच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे आहे. सीआयएसएफ सदस्यांना एंट्री पॉईंटवर झडती घेणे आणि बॅग तपासण्याचे काम सोपवण्यात आले आहे. ते ताज कॉम्प्लेक्स आणि मुख्य समाधीच्या आतील गर्दीचे व्यवस्थापन देखील करतात. अहवालात असे म्हटले आहे की, विनेश आणि श्याम बिसलरीच्या बाटलीत गंगाजल घेऊन आत गेले होते.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती गुप्तपणे कबरीवर पाणी टाकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक सुरक्षा कर्मचारीही दिसत आहे. मात्र, ती व्यक्ती कबरीवर पाणी टाकत असताना त्याला कोणीही अडवत नाही. (हेही वाचा - Taj Mahal Ticket Prices: पर्यटकांना ताजमहाल पाहण्यासाठी मोजावे लागू शकतात जास्त पैसे; जाणून घ्या किती रुपयांना मिळेल तिकीट)

पहा व्हिडिओ - 

अखिल भारतीय हिंदू महासभा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा मीरा राठोड सोमवारी सकाळी कावडसह ताजमहालमध्ये पोहोचल्या. त्यांनी कावड गंगाजलाने भरली. त्यांना ताजमहाल येथे गंगाजल अर्पण करायचे होते, परंतु, पोलिसांनी त्यांना पश्चिमेकडील गेटवर अडवले. ('Taj Mahal हा Shah Jahan ने बांधला नाही'; 'हिंदू सेना'च्या संघटनेच्या याचिकेचा विचार करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश)

अनेक तास सुरक्षा चौकात हा गोंधळ सुरू होता. त्यांनी दावा केला की, तेजो महालय हे शिवाचे मंदिर असून ती शिवलिंगावर गंगाजल अर्पण करण्यासाठी आली होती. याआधी 2019 मध्ये मीना दिवाकर नावाच्या महिलेनेही ताजमहालमध्ये कावड अर्पण करण्याचा प्रयत्न केला होता. मीना दिवाकर यांनीही तेथे शिवआरतीही केली होती. वृत्तानुसार, मीना दिवाकर यांच्यावर सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व प्रकरणे ताजमहालमध्ये कावड अर्पण करणे आणि शिव आरती करण्याशी संबंधित आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now