15th August Working Day Funny Memes: 15 ऑगस्ट वर्किंग डे? कॉर्पोरेट मीम्सनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
यंदा स्वातंत्र्य दिन शनिवारी येत असल्याने सहा दिवसांचा आठवडा असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा दिवस नियमित कामाचाच राहणार आहे. भारतात सबस्टिट्यूट हॉलिडे पद्धत नसल्याने अनेकांनी मजेशीर मीम्स मधून आपली खंत व्यक्त केली आहे.
देशभर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा 15 ऑगस्ट हा दिवस अनेकांसाठी कामाचा दिवस ठरला आहे. सुट्टी हुकल्याने नाराज झालेल्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांनी आपली खंत विनोदी अंदाजात सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. अनेकांचे वायरल मीम्स सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहेत. सर्वाधिक व्हायरल होणाऱ्या मीम्समध्ये कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या रोजच्या धावपळीची खिल्ली उडवली जात आहे. "देश आझाद है, पर कॉर्पोरेट मजदूर की छुट्टी अभी भी पेंडिंग है," अशा कॅप्शनसह अनेक पोस्ट्स सोशल मीडियावर फिरत आहेत. सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागत असल्याची खंत अनेकांनी मजेशीर मीम्समधून व्यक्त केली जात आहे. नक्की वाचा: Happy Independence Day Wishes: भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी Quotes, Greetings, Images आणि WhatsApp Status!
सॅल्यूट कोणाला करायचा, झेंड्याला की मॅनेजरला?
सर्वात गाजलेला जोक म्हणजे, कॉर्पोरेट कर्मचारी आधी झेंड्याला सॅल्यूट करण्याऐवजी एचआर, मॅनेजर की लॅपटॉप यापैकी कोणाला आधी सॅल्यूट करायचा, याचा विचार करतात. "कॉर्पोरेट आयुष्यातील स्वातंत्र्यही अटी व शर्तींसह येते," असा खोचक टोला यातून लगावला जात आहे. नक्की वाचा: Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यापासून ते गाव पातळीपर्यंत, राष्ट्रध्वज कोण फडकवतो?
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
यंदा 15 ऑगस्ट शनिवारी, सहा दिवसांचा आठवडा असणाऱ्यांना सुट्टी नाहीच
दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा होणारा स्वातंत्र्य दिन ही निश्चित तारखेची राष्ट्रीय सुट्टी असली, तरी हा दिवस आठवड्यातील कोणत्या वारी येणार, हे दरवर्षी बदलते. कारण दिनदर्शिका सात दिवसांच्या आठवड्याशी नेमकी जुळत नाही. यंदा 2026 मध्ये 15 ऑगस्ट हा दिवस शनिवारी येत आहे. खासगी कंपन्या, लहान व्यवसाय आणि सहा दिवसांचे कामकाज असणाऱ्या अनेक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शनिवार हा नियमित कामाचा दिवस असतो. त्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्यक्षात या दिवशी कामावर हजर राहावे लागणार आहे.
भारतात 'सबस्टिट्यूट हॉलिडे' ची पद्धत नाही
अनेक देशांमध्ये एखादी सरकारी सुट्टी शनिवार किंवा रविवारी आल्यास त्या बदल्यात आठवड्यातील दुसऱ्या दिवशी सुट्टी दिली जाते. याला 'सबस्टिट्यूट हॉलिडे' असे म्हणतात. मात्र भारतात अशी पद्धत अस्तित्वात नाही. त्यामुळे एखादी गॅझेटेड सुट्टी वीकेंडला आली, तरी ती त्याच दिवशी नोंदवली जाते आणि आठवड्यातील इतर कोणत्याही दिवशी त्याऐवजी सुट्टी दिली जात नाही.
सुट्टी न मिळाल्याची नाराजी असली, तरी नेटकऱ्यांनी ती विनोदी पद्धतीने मांडत सोशल मीडियावर हलकाफुलका आनंद निर्माण केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कॉर्पोरेट संस्कृतीवर मार्मिक भाष्य करणारे हे मीम्स चर्चेचा विषय ठरले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

