Happy Independence Day Wishes: भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी Quotes, Greetings, Images आणि WhatsApp Status!
यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची संकल्पना 'युवा शक्ती फॉर विकसित भारत@२०४७' आणि 'वंदे मातरमच्या १५० व्या वर्षपूर्ती' यावर आधारित आहे, जी आपल्या युवा पिढीला आणि राष्ट्रीय गीताला आदरांजली वाहते.
80th Independence Day Wishes: भारत देश यंदा 15 ऑगस्टला आपला 80वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करणार आहे. ब्रिटीशांच्या गुलामशाहीला दूर करून भारताने 15 ऑगस्ट 1947 दिवशी स्वातंत्र्य मिळवले होते. यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या सार्यांचेच स्मरण करत भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. विविधतेतील एकता' या भारतीय संस्कृतीच्या मूलभूत तत्त्वाची आठवण करून देणारा आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम करण्याची प्रेरणा देणारा हा दिवस उत्साहाने साजरा करत तुमच्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईक, आप्तेष्टांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Stickers, Images पाठवून आनंद द्विगुणित करा.
यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची संकल्पना 'युवा शक्ती फॉर विकसित भारत@२०४७' आणि 'वंदे मातरमच्या १५० व्या वर्षपूर्ती' यावर आधारित आहे, जी आपल्या युवा पिढीला आणि राष्ट्रीय गीताला आदरांजली वाहते. नक्की वाचा: Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यापासून ते गाव पातळीपर्यंत, राष्ट्रध्वज कोण फडकवतो?
80व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

तिरंग्याच्या रंगांत न्हाऊ दे देशप्रेमाची पहाट,
भारतभूमीच्या वैभवाने उजळू दे प्रत्येक वाट.
80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वीरांच्या बलिदानाने मिळाले स्वातंत्र्याचे आकाश,
त्यांच्या त्यागाला नमन, भारताचा वाढो प्रकाश.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्याच्या ८० वर्षांचा अभिमान हृदयात घेऊया,
नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी एकजुटीने पुढे जाऊया.
जय हिंद! जय भारत!

तिरंगा फडकताना मनात जागो देशभक्तीची ज्योत,
भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने देऊया हात.
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

आकाशापेक्षा उंच असो भारताचा गौरव,
प्रत्येक भारतीयाच्या मनात जागो देशप्रेमाचा उत्सव.
80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
भारताच्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात. राष्ट्रपती स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण देतात. राज्य राजधान्यांमध्ये मुख्यमंत्री ध्वजारोहण करतात. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि निवासी सोसायट्यांमध्ये ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2026 10:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

