COVID-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणखी 3 महिन्यांसाठी 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देणार - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषदांतर्गत सर्व अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांममधील कंत्राटी कर्मचारी- कामगारांना पुढील 3 महिन्यांसाठी 50 लाखांचे विमा कवच देणार असल्याचं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषदांतर्गत सर्व अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांममधील कंत्राटी कर्मचारी- कामगारांना पुढील 3 महिन्यांसाठी 50 लाखांचे विमा कवच (Insurance Cover) देणार असल्याचं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी सांगितलं आहे.
यावेळी हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की, गावांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. त्यानुषंगाने ग्रामविकास विभागाने यापूर्वी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्ती, संगणक परिचालक यांना एप्रिल ते जून 2020 या तीन महिन्यांमध्ये 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले होते. परंतु, ही मुदत सध्या संपली आहे, असंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. (हेही वाचा - Coronavirus Cases In Mumbai: मुंबईमध्ये आज 1,282 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर 68 रुग्णांचा मृत्यू; शहरातील एकूण रुग्णांची संख्या 88,795 वर पोहचली)
दरम्यान, राज्य शासनाने राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने अंगणवाडी कर्मचारी, आशाताई, आशा प्रवर्तक यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश नव्हता. त्यामुळे यासंदर्भात ग्रामविकास विभागामार्फत आज शासन निर्णय जारी करुन जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी तथा कामगार यांना पुढील 3 महिन्यांसाठी विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व कर्मचारी कोरोना संकटाच्या काळात घरोघरी जाऊन जीव धोक्यामध्ये घालून काम करत आहेत. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले आहे.