'Sex With Parents' Controversy: अश्लिल विनोद प्रकरणी YouTube कडून कारवाई, Ranveer Allahbadia याचा व्हिडिओ हटवला; काय घडलं आतापर्यंत?

आई-वडील सेक्स आणि तत्सम विषयावर केलेल्या अश्लील वक्तव्यावरुन उद्भवलेल्या वादानंतर YouTube ने कारवाई केली आहे. कॉमेडियन समय रैना आणि रणवीर अल्लाबदियाचा शो आपल्या मंचावरुन काढून टाकला आहे.

YouTube ने लोकप्रिय पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया (Ranveer Allahbadia) याचा समय रैना (Samay Raina) याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' (India’s Got Latent) शोचा एक भाग केंद्र सरकारच्या निर्देशानंतर काढून टाकला आहे. ज्यामध्ये अश्लील सामग्री होती ज्यामुळे जनमानसात संताप आणि अनेक तक्रारी (Viral Controversy) निर्माण झाल्या होत्या. शो दरम्यान अलाबादिया याने अनुचित टिप्पणी केल्यानंतर या भागात वाद निर्माण झाला, ज्यामुळे डिजिटल कंटेंटवर कडक नियमन करण्याची मागणी करण्यात आली.

सरकारची सूचना आणि YouTube कडून कारवाई

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी मंगळवारी (11 फेब्रुवारी) पुष्टी केली की, भारत सरकारच्या आदेशानंतर वादग्रस्त भाग YouTube वर ब्लॉक करण्यात आला आहे. गुप्ता यांनी एक्स (जुने ट्विटर) पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, रणवीर अलाबादिया याच्या अश्लील आणि विकृत टिप्पण्यांसह YouTube वरील 'इंडिया हॅज लेटेंट' हा भाग भारत सरकारच्या आदेशानंतर ब्लॉक करण्यात आला आहे'. गुप्ता यांनी एक्सवर या व्हिडिओचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला. ज्यामध्ये संदेश पाहायला मिळत आहे की, 'हा व्हिडिओ उपलब्ध नाही.. सरकारच्या कायदेशीर तक्रारीमुळे ही सामग्री देशाच्या डोमेनवर उपलब्ध नाही. (हेही वाचा: FIR Against Ranveer Allahbadia: रणवीर इलाहाबादियाच्या अडचणी वाढल्या; माफी मागितल्यानंतरही FIR दाखल)

कांचन गुप्ता यांच्याकडून कारवाईची पुष्टी

मुंबई पोलिसांकडून अलाबादिया आणि रैना यांना चौकशीसाठी समन्स

जनमानसातील तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया आणि प्राप्त तक्रार याच्या आधारे मुंबई पोलिसांनी रणवीर अलाबादिया आणि समय रैना दोघांनाही तपासकर्त्यांसमोर हजर राहण्यासाठी आणि सुरु चौकशीत सहकार्य करण्यासाठी समन्स बजावले आहे. पोलिसांनी त्यांच्या चौकशीची तारीख निर्दिष्ट केलेली नसली तरी, अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की त्यांना या प्रकरणाची त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. या एपिसोडमध्ये सहभागी झालेले अलाहबादिया, रैना, युट्यूबर आशिष चंचलानी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मखिजा (द रिबेल किड) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (हेही वाचा, Ranveer Allahbadia Controversy: रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीमध्ये वाढ; संसदेत उपस्थित होणार मुद्दा, All Indian Cine Workers Association ने केली India's Got Latent वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी)

अलाहबादिया यांच्या वक्तव्यामुळे संताप

अलाहबादिया यांच्या बीअरबायसेप्स युट्यूब चॅनेलवर 1 कोटी 5 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आणि 45 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेल्या अलाहबादिया यांनी शोमधील एका स्पर्धकाला विचारले की, "तुम्ही आयुष्यभर तुमच्या पालकांना सेक्स करताना पाहाल का, की तुम्ही एकदा सामील होऊन ते कायमचे थांबवाल?" या प्रश्नाचा मोठ्या प्रमाणात अश्लील आणि अयोग्य म्हणून निषेध करण्यात आला, ज्यामुळे ऑनलाइन वाद निर्माण झाला आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील अश्लील सामग्रीविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली.

वाढत्या टीकेदरम्यान अलाहबादिया याची माफी

सोशल मीडिया आणि जनमानसात वाद वाढत असताना वक्तव्य आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अलाहबादिया याने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. आपण केलेल्या टिप्पण्या अयोग्य आणि मजेदार नसल्याची त्याने कबुली दिली ​​जाहीर माफी मागितली. "विनोदी ही माझी ताकद नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे," असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देताना पॉडकास्टरविरुद्ध कारवाईचे संकेत दिले आहेत. फडणवीस यांनी म्हटले की, 'प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते,' असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी सन्माननीय अभिव्यक्तीची गरज अधोरेखित केली आहे, अश्लीलता कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now