Yavatmal Accident: यवतमाळ येथे ट्रक आणि कारच्या धडकेत भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जन जखमी झाले आहे.
Yavatmal Accident: यवतमाळ येथील वणी मारेगाव मार्गावर एका ट्रक आणि अर्टिगा कारचा भीषण अपघात झाल्या. या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जन जखमी झाले आहे. सिंमेट वाहून नेणारं ट्रक अर्टिगा कारला धडक दिल्याने अपघात घडून आला. नवाज मुझफ्पर शेख असं आर्टिगा चालक मृतकाचे नाव आहे. सिमेंट वाहून नेणारं ट्रक हे वणीवरून मारेगावच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. (हेही वाचा- नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टर-एसटी बसच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, वाहन क्रमांक (MH -13- DE -7906) ने चंद्रपुरला जात होते तर सिमेंटची वाहतुक करणारा ट्रक क्रमांक (MH -34-BG- 1337) हे मारेगावला जात होते. ट्रक भरधाव असल्याने कारला धडक दिली. या भीषण धडकेत एकजण जागीच ठार झाला. ही घटना २४ जानेवारीच्या दुपारच्यानंतर घडली.
अपघाताची माहिती मिळताच,नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी येऊन त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. या घटनेची तक्रार वणी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये नवाज यांची आई, मोठ्या भावाचे दोन लहान मुले, वहिनी आणि मित्र कमल शेख यांचा समावेश आहे.