Nagar-Kalyan Highway Accident: नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टर-एसटी बसच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार यांच्यात अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापूर फाट्यानजीक मध्यरात्री अपघात झाला.
अहमदनगर जिल्ह्यातून (Ahamadnagar) भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर (Nagar-Kalyan Highway) एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मंगळवारी मध्यरात्री अडीज वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा - Mumbai Shocker: मुंबई लोकल च्या धडकेत रूळावर काम करत असलेल्या 3 जणांचा मृत्यू)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार यांच्यात अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापूर फाट्यानजीक मध्यरात्री अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला.
जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 24, 2024 10:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

