Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेस वेवर मोठा अपघात; पुण्यातील 5 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
तर, दोघे जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमी हे पुणे (Pune) जिल्ह्यातील असल्याचे समजते.
यमुना एक्सप्रेस वेवर (Yamuna Expressway) झालेल्या भीषण अपघातात 4 महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर, दोघे जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमी हे पुणे (Pune) जिल्ह्यातील असल्याचे समजते. ग्रेटर नोएडा येथील जेवर थाना परिसरातील यमुना एक्सप्रेस वे वर आगारा येथून नोएडाच्या दिशेने जाताना जेवर टोल प्लाझापासून साधारण 40 किलोमीटर इंतरावर माईलस्टोनजवळ हा अपघात घडला. प्राप्त माहितीनुसार,चालकाने बोलेरो कारवरील नियंत्रण गमावल्याने कार डंपरखाली जाऊन घसली आणि हा अपघात घडला.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारे घडलेल्या या अपघातात 7 लोक गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच चार महिला आणि एका पुरुषाला मृत घोषीत केले. इतर दोन जखमींची स्थिती अत्यंत गंभीर आहे. (हेही वाचा, Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रोपीलीन गॅस टँकर उलटला; तिघांचा मृत्यू)
बेलोरा गाडीतून प्रवास करणाऱ्यांमध्ये चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे, मालन विश्वनाथ कुंभार, रंजना भरत पवार, नवंजन मुजावर, नारायण रामच्ंद्र कोळेकर, सुनीता राजू गस्टे यांचा समावेश आहे. यापैकी चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे, मालन विश्वनाथ कुंभार, रंजना भरत पवार, नवंजन मुजावर यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. तर नारायण रामच्ंद्र कोळेकर, सुनीता राजू गस्टे हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.