खुशखबर! महाराष्ट्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; उद्यापासून करू शकता अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे. पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग दिली जाईल.

Representational Image (Photo credits: Pixabay)

तुम्ही सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात आहात? आणि तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा आहे? तर तुमच्यासाठी नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागात (Water Resources Department) कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) ग्रेड बी साठी नोकर भरती (Recruitment) सुरु झाली आहे. या पदासाठी तब्बल 500 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे. पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग दिली जाईल. उमेदवार 15 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात.

वयमर्यादा -

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 38 असणे गरजेचे आहे.

महत्वाच्या तारखा -

25 एप्रिल, 2019 पासून डब्ल्यूआरडी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करेल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2019 असणार आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदाच्या 865 जागा रिक्त; पहा कसा कुठे कराल अर्ज?)

पदाचे नाव –

कनिष्ठ अभियंता – सिव्हील  (Junior Engineer- Civil) – 500 जागा

शैक्षणिक पात्रता:

ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/संस्था/विद्यापीठातून सिव्हील अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केला असेल असे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.