Coronavirus: WHO ची मोठी घोषणा; कोरोनावर देण्यात येणाऱ्या औषधांच्या यादीतून Remdesivir बाद
मात्र, अद्यापही कोरोनावरील गुणकारी औषधाची निर्मिती झालेली नाही. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोव्हिड-19 (COVID19) या संसर्गजन्य आजारावर लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही कोरोनावरील गुणकारी औषधाची निर्मिती झालेली नाही. देशात एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे अँटी-व्हायरल ड्रग रेमडेसिवीरचा (Remdesivir) कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापर न करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. हे औषध कोरोना बरे होण्यासाठी गुणकारी ठरते, यासंबंधीचा कोणताही पुरावा नाही, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. यामुळे संपूर्ण देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओचे प्रवक्ते तारिक जसारेविक यांनी एका इमेलला पाठवलेल्या उत्तरात असे म्हटले आहे की, "होय आम्ही रेमेडिसविर हे औषध पी.क्यू प्रीक्वालिफिकेशन लिस्टमधून बाद केले आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी एकाही देशाने हे औषध खरेदी करु नये." तसेच ज्या देशांमधील रुग्णालयांमध्ये रेमेडिसविर या औषधाचा वापर केला जातो त्यांनी तो बंद करावा, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. सुरुवातीला अनेक देशातील वैज्ञानिकांनी रेमेडिसविर औषध प्रभावी ठरत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आज जागतिक आरोग्य संघटनेने रेमेडिसिविर हे औषध कोरोनावर वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या यादीतून बाद केले आहे.
सुरुवातीला इबोला या आजारासाठी रेमडीसीवर औषधाचा वापर केला जात होता. त्यानंतर मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये हे औषध प्रभावी ठरत असल्याची माहिती समोर आली होती. यात कोरोना रुग्णांचा हॉस्पिटलमधील कालावधी 15 दिवसांवरून 11 दिवसांवर येत होता. मात्र, 30 देशांमधील 11 हजराहून अधिक रूग्णांचा रुग्णालयातील काळ कमी होण्यास किंवा त्यांचा प्राण वाचवण्यासा रेमडेसिवीर औषधाचा फारसा किंवा काहीच उपयोग झाला नाही, असे डब्ल्यूएचओच्या प्रि-प्रिंटमध्ये सांगण्यात आले आहे. हे देखील वाचा- Oxford COVID-19 Vaccine सर्वसामान्यांसाठी एप्रिल 2021 पर्यंत 'या' किंमतीत उपलब्ध होईल; SII CEO अदर पुनावाला यांची माहिती
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने भारतासह संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत 5 कोटी 76 लाख 62 हजार 241 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैंकी 13 लाख 72 हजार 661 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 3 कोटी 99 लाख 78 हजार 863 जणांनी कोरोनावर मात केली आहे.