La Nina and Monsoon 2024: मान्सून कधी येणार? यंदा पाऊसमान कसे? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

ज्यामध्ये यंदाचा मान्सून सामान्य राहणार आहे. इतकेच नव्हे तर तो यंदा वेळेपेक्षा काहीसा लवकर येण्याची देखील शक्यता असल्याचे म्हटले आहे.

Monsoon | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

IMD Monsoon Prediction: राज्यात उन्हाळा वाढू लागला आहे. परिणामी तापमान जोर पकडत आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाई उद्भवली आहे तर दुसऱ्या बाजूला विविध ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट पाहायला मिळते आहे. परिणामी यंदाच्या वर्षी पाऊसमान कसे असेल याबाबत शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये आतापासूनच काळजी व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, बळीराजाची चिंता काहीशी कमी होईल, असा हवामानाचा अंदाज (IMD Weather Forecast) भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) द्वारा व्यक्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये यंदाचा मान्सून सामान्य राहणार आहे. इतकेच नव्हे तर तो यंदा वेळेपेक्षा काहीसा लवकर येण्याची देखील शक्यता असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मान्सून कधी येणार? (When Will Monsoon 2024) या प्रश्नाचे तारीख, वार देऊन थेट उत्तर अद्याप मिळाले नसले तरी, तो लवकर येणार हे बरेच सुखावणारे आहे.

यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर

हिंद महासागर द्विध्रुव (IOD) आणि ला नीना परिस्थितीच्या एकाचवेळी सक्रियतेमुळे या वर्षीचा मान्सून नेहमीपेक्षा लवकर येऊ शकतो, असा अंदाज अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. या समवर्ती हवामानाच्या घटना भारतातील विविध प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि जोरदार मान्सूनचा मार्ग मोकळा करु शकतात, असे आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे. दरम्यान, मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या सरासरीपेक्षा थंड तापमान आणि हिंदी महासागर द्विध्रुव (IOD), हिंद महासागरातील समुद्र-पृष्ठभागाच्या तापमानातील चढ-उतार द्वारे वैशिष्ट्यीकृत ला नीना, वारंवार घडणारी हवामान घटना आहे. एक अद्वितीय हवामानशास्त्रीय घटना, असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा, Environmental Changes & Monsoon In India: 40 वर्षांत 38 टक्के जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमानामध्ये वाढ- CEEW च्या पाहणीचा निष्कर्ष)

यंदाचा मान्सून सामान्य

ला निना आणि समुद्रांमध्ये उद्भवणारी स्थिती नैऋत्य मान्सूनवर लक्षणीय प्रभाव पडेल अशी अपेक्षा आहे. ज्यामुळे या अद्वितीय परिस्थिचा अभ्यास करुन नोंद घेण्याची संधी अभ्यासकांना मिळेल. या द्वारे माहितीचा प्रचंड साठाही तयार होईल, असे हवामानाच्या अभ्यासकांनी म्हटले आहे. बहुतेक हवामान मॉडेल्स पॅसिफिकमध्ये ला नीनाच्या निर्मितीसह विषुववृत्तीय हिंदी महासागरावरील सकारात्मक IOD टप्पा सूचित करतात. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर या घटनांचे एकाचवेळी अस्तित्व दर्शविते की हे घटक जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सामान्यतः अनुभवल्या जाणाऱ्या मान्सूनच्या उच्च स्थितीत वाढ करू शकतात.  (हेही वाचा, Maharashtra Rain: राज्यातील अनेक जिल्ह्यात गारपीट, अवकाळीचा फटका; पिकांचे मोठे नुकसान)

शेतकऱ्यांच्या दृष्टीने मान्सूनला विशेष महत्त्व असते. साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. असे असले तरी त्याच्या कितीतरी दिवस आगोदर तो भारतात प्रवेश करतो. मान्सून भारतात दाखल होण्याचे ठिकाण हे केरळ असते. केरळमधूनच मान्सून भारतात दाखल होतो आणि परतही जातो.