Amruta Fadnavis Tweet: लक्ष्मीपूजन निमित्त अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय मागितले? पाहा ट्वीट

दिवाळीच्या सणानिमित्त देशभरात वेगळा उत्साह असला तरी कोरोनाचा अंध:कार दूर होऊन कोरोनामुक्त पहाट होण्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे.

Amruta Fadnavis and Devendra Fadnavis (Photo Credits: Instagram)

कोरोना संकटकाळात प्रत्येकजण योग्य ती खबरदारी घेऊन यंदाची दिवाळी (Diwali 2020) साजरा करताना दिसत आहे. दिवाळीच्या सणानिमित्त देशभरात वेगळा उत्साह असला तरी कोरोनाचा अंध:कार दूर होऊन कोरोनामुक्त पहाट होण्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आपल्या घरी सहकुटूंब लक्ष्मीचे पूजन केले आहे. कुटुंबासमवेत पूजा केल्यानंतर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्विटच्या माध्यमातून अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे.

अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमी अक्टिव्ह असतात, याबाबत सर्वांनाच माहिती आहे. दरम्यान, त्या अनेकदा सामाजिक उपक्रमांबद्दल, कुंटुंबातील आनंदाचे क्षण आपल्या चाहत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी गेल्या काही दिवासांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे कोरोनावर मात करून घरी परतल्याचे ट्वीटरच्या माध्यमातून सांगितले होते. यातच त्यांनी आज कुटुबासमेवत लक्ष्मी पूजा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक खास ट्विट केले आहे. ज्यात त्या म्हणाल्या की, तुमच्याकडून मला कधीच काही नको, केवळ तुमची साथ हवी आहे. तुमची साथ ही दिवाळीच्या मिठाईपेक्षाही गोड आहे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रातील भाविकांसाठी खूषखबर! 16 नोव्हेंबरपासून मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं खुली करण्यास राज्य सरकारची परवानगी

अमृता फडणवीस यांचे ट्वीट-

कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. तब्बल सात महिन्यांतील हा पहिला सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. कोरोनावर मात करण्यात भारताने मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. मात्र, अद्यापही देशावर कोरोनाचे सावट आहे. यामुळे लवकरात लवकर भारतातून कोरोनाचे संकट कायमचे नष्ट व्हावे, अशी प्राथना प्रत्येकजण करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif