Western Railway Mega Block: वसई रोड - वैतरणा स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर आज रात्रकालीन मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेनं शुक्रवार-शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर शुक्रवारी रात्री 11.50 ते मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

Western Railway Mega Block: वसई रोड - वैतरणा स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर आज रात्रकालीन मेगाब्लॉक
Mega Block | (File Image)

पालघरमध्ये आज पश्चिम रेल्वेवर (Western Railway) आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई रोड (Vasai Road Railway Station) आणि वैतरणा (Vaitarna Railway Station) स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक (Mega Block) असणार आहे. वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेकडून शुक्रवार-शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.  (Mumbai MHADA 2023 Lottery: म्हाडा मुंबईच्या घरांसाठी अर्ज करण्याच्या, स्वीकारण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याच्या विचारात; लवकरच अधिकृत घोषणा)

पश्चिम रेल्वेनं शुक्रवार-शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर शुक्रवारी रात्री 11.50 ते मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत ट्रेन क्रमांक 19101 विरार-भरूच मेमू विरारहून 15 मिनिटं उशिरानं सुटेल. म्हणजे पहाटे 4.35 वाजता नियोजित वेळेऐवजी ती 4.50 वाजता निघेल. पश्चिम रेल्वे मार्गावरुन आज मध्यरात्री प्रवास करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी लोकलचं वेळापत्रक पाहून बाहेर पडा.

प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2023 11:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).