मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्याशी बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांचे भाष्य

केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात शुक्रवारी बंद दाराआड चर्चा झाली.

Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात शुक्रवारी बंद दाराआड चर्चा झाली. या बंद दाराआड चर्चेवरून राज्यात राजकीय चर्चा जोरदार रंगू लागल्या आहेत. भाजप-शिवसेना (BJP- Shiv Sena) यांच्यात युती होणार का? अशाप्रकारच्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बंद दाराआड मुख्यमंत्र्याशी झालेल्या चर्चेवर भाष्य केले. "मुख्यमंत्र्यासोबत झालेली चर्चा लपून छपून झाली नाही, संगळ्यांसमोर झाली. ज्या ठिकाणी बैठक झाली, त्याच हॉलच्या बाजूला मुख्यमंत्र्याचे ऑफीस आहे. जिथे आम्ही दहा मिनिटे चर्चा केली. ती चर्चादेखील ओबीसी आरक्षणाबाबत होती", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच कशाप्रकारे आपण केले तर तीन-साडेतीन महिन्यात आपण ओबीसींचे राजकीय आरक्षण परत करू शकतो? यावरही त्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. हे देखील वाचा-Nagpur: पत्नीने Matrimonial Sites वर अपलोड केली प्रोफाईल; उच्च न्यायालयाकडून पतीला घटस्फोट मंजूर, जाणून घ्या काय आहे प्रकरण

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असताना केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री आणि रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोठे विधान केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याची मला माहिती नाही. परंतु, या दोघांच्या भेटीनंतर भाजप- शिवसेना पुन्हा एकत्रित येण्याची शक्यता आहे, असे रामदास आठवले म्हणाले होते.