Pune Crime News: पुण्यात गायकाकडून राष्ट्रीय तिंरग्याचा अपमान, पोलीसांकडून अटकेची कारवाई सुरु;जनता संतापली
पुणे पोलीसांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे.
Pune Crime News: भारताला स्वातंत्र्याचे 76 वे वर्ष पूर्ण होत असताना, पुण्यात (Pune) स्वातंत्र्यपूर्व सोहळ्यात एक धक्कादायक घटना घडली. कोरेगाव पार्कमधील एका क्लबमध्ये (Club) आयोजित केलेल्या संगीत मैफिलीदरम्यान, एका गायकाकडून राष्ट्रीय तिरंग्याचा अपमान करण्यात आला, त्यामुळे संतापाचा भडका उडाला आणि त्यानंतर पोलीस तपासाला सुरुवात झाली. या घटनेमुळे राज्यभरातून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संतापलेल्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कंमेटमध्ये तीला सुनावले आहे.पुणे पोलीसांनी तीला अटक करण्याची कारवाई सुरु केली आहे.
ही घटना "शांती पीपल" या म्युझिकल बँडच्या परफॉर्मन्सदरम्यान घडली, जिथे गायिका उमा शांती तिचे गाणे सादर करत होत्या. घटनांच्या अनपेक्षित वळणावर, उमा शांतीने हातात तिरंगा धरला आणि त्यानंतर तो प्रेक्षकांमध्ये फेकला, ही कृती व्हिडिओमध्ये कैद झाली आणि त्वरीत व्हायरल झाली.या घटनेमुळे जनतेने संताप व्यक्त केला आहे. मंढवा पोलीसांनी या घटने अंतर्गत नोंद घेतली आहे. या घटनेची गांर्भीय लक्षात तीच्यावर लवकरच एफआरआय नोंदवण्यात येणार आहे. आणि पुढील तपास सुरु करणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक कार्तिक मोरे आणि गायिका उमा शांती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज स्वातंत्र्यदिन असल्याने या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त करत आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजक कार्तिक मोरे आणि गायिका उमा शांती यांच्यावर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.