जगभरात सध्या करोना व्हायरसने (Coronavirus) आपली दहशत पसरवली आहे. चीनमध्ये जन्माला आलेल्या या व्हायसरमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसचा बचाव करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या बाबतीत खोटी माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे. यातच वर्धा (Wardha)जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) शहरात 65 वर्षीय व्यक्तीला करोना व्हायरच्याबाबतीत अफवा (Fake Information) पसरवणे महागात पडले आहे. नुकतेच आपण दुबईवरून परतलो असून कुठेबी कोरोनाची तपासणी होत नसल्याचे माहिती शेजाऱ्यांना दिली. यामुळे आरोपीच्या विरोधात स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी करत आहेत.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना बाधितांचा आकडा 63 पर्यंत पोहचल्यामुळे राज्यातील सर्व संबंधित यंत्रणा अधिक दक्षतेने काम करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईसह महत्वाच्या 4 शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता लॉक-डाऊन केले. यातच हिंगणघाट परिसरात कोरोना व्हायरसच्या बाबतीत अफवा पसरवल्याप्रकरणी एका वृद्धाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रेमचंद्र भानुप्रिया असे अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याचे हिंगणघाट शहरातील टिळक वॉर्ड परिसरात दुकान आहे. ी दुबईवरुन नुकताच हिंगणघाटला आलोय. करोनाची तपासणी कुठेही होत नाहीये अशी खोटी माहिती प्रेमचंद यांनी शेजाऱ्यांना दिली. आरोपीने सांगितलेल्या माहितीचं गांभीर्य लक्षात घेता स्थानिक अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. स्थानिक पोलिसांच्या तपासणीत आरोपीकडे पासपोर्टचे नसल्याचे निष्पन्न झाले. केवळ बढाई मारण्यासाठी आपण हा प्रकार केल्याचे प्रेमचंद यांनी कबूल केले. त्यामुळे प्रेमचंद यांच्याविरोधात कोरोना विषयी अफवा पसरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- मुंबई: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर माहिम येथील सेंट मायकल हायस्कूलचा महत्वपूर्ण निर्णय; हात स्वच्छ धुतल्यानंतरच दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला जातोय परीक्षा केंद्रात प्रेवश
पुणे शहरात 17 मार्च रोजी खोट्या माहितीचा प्रसार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती. पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये उतरलेल्या परदेशी पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविण्यात आली होती. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी बीडमध्येही अशाच प्रकारे अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायसची लागण होऊन आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून 63 लोकांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.