Walmik Karad Police Surrender: वाल्मिक कराड पुणे CID पोलिसांना शरण, Santosh Deshmukh Murder प्रकरणात मोठी अपडेट
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वाधिक चर्चित नाव वाल्मिक कराड अखेर पुणे येथे CID पोलिसांना शरण आला आहे. पोलीस त्याला अटक करतात की आणखी काही कारवाई करतात याबाबत उत्सुकता आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणातील चर्चीत नाव आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad Police Surrender) अखेर पुणे येथे शरण आला आहे. त्याने पुणे सीआयडीसमोर मंगळवारी दुपारी 12.00 वाजणेच्या सुमारास स्वत:ला स्वाधीन केले. आता त्याला अटक केली जाते की, आणखी काही कारवाई केली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. तत्पूर्वी त्याने एक व्हिडिओ शेअर करत आपण आत्मसमर्पण (Surrender) करत असल्याचे जाहीर केले. याच व्हिडिओमध्ये त्याने असेही सांगितले की, मला अटकपूर्व जामीन अर्जाचा पर्याय असताना देखील आपण पोलिसांच्या स्वाधीन होतो आहोत. पोलिसांनीही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करवे,असे सांगतानाही तो व्हिडिओत दिसतो.
संतोष देशमुख हत्या प्रकणामुळे महाराष्ट्र हादरला
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरुन गेला. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण प्रचंड गाजले. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील आमदारांनीही हे प्रकरण विधिंडळात लावून धरले. ज्यामुळे या प्रकरणात आरोपींवर कारवाई करणे सरकारला भाग होते. पुणे सीआयडीसमोर शरण आलेला वाल्मिक कराड हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या अतिशयजवळचा असल्याचे मानले जाते. स्वत: मुंडे यांनीही ते आपल्या जवळचे असल्याचे जाहीर मान्य केले आहे. दरम्यान, असे असले तरी मुंडे हे ज्या पक्षाचे नेते आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र मौन बाळगले आहेत. त्यामुळे अजित पवार यांचा पक्ष मुंडे यांच्यावर काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Beed Morcha: धनंजय मुंडे यांची विकेट? वाल्मिक कराड यांच्या अटकेची शक्यता; Santosh Deshmukh हत्या प्रकरणी बीड येथे विराट मोर्चा; देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारवर दबाव)
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चिंतेचा विषय
दरम्यान, संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटत आहे दोनच दिवसांपूर्वी बीड येथे सर्वपक्षीय विराट मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी ही मागणी प्रामुख्याने होती. तसेच, या प्रकरणात जोरदार चर्चेत असलेल्या वाल्मिक कराड यांना तातडीने अटक करावी, अशी एकमुखी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चात भाजप आमदार सुरेश धस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जीतेंद्र आव्हाड, देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे अभिमन्यू पवार, संभाजीराजे छत्रपती आणि इतरही अनेक नेते उपस्थित होते. सर्वपक्षीय असलेल्याया मोर्चाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. (हेही वाचा, Prajakta Mali On Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची महिला आयोगाकडे तक्रार)
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना आगोदरच अटक करण्यात आली आहे. अद्यापही काही आरोपी फरार आहेत. मात्र, या प्रकरणाचा केंद्रबिंदू वाल्मिक कराड असल्याचे मानले जात आहे. असे असले तरी, कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल नाही. त्याच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सीआयडी आता त्यावर काय कारवाई करते याबाबत उत्सुकता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)