पंढरपूर: आषाढी यात्रेपूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीवर वज्रलेप करण्यात येणार
यासाठी शासनाकडून परवानगी मिळाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. यापूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीला तीन वेळा वज्रलेप करण्यात आला होता. यंदा तब्बल 8 वर्षांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर व्रजलेपनाची प्रक्रिया पार पडणार आहे.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukmini Temple) मूर्तीवर आषाढी वारीपूर्वी वज्रलेप (Vrajlap) करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून परवानगी मिळाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. यापूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीला तीन वेळा वज्रलेप करण्यात आला होता. यंदा तब्बल 8 वर्षांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर व्रजलेपनाची प्रक्रिया पार पडणार आहे.
दरवर्षी लाखो भाविकांचे विठूरायाचं पदस्पर्श दर्शन घेतात. पदस्पर्शामुळे आणि वातावरणामुळे मूर्तीची झीज होते. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मूर्तीला वज्रलेप करण्यास परवानगी द्यावी, असा ठराव महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवला होता. या ठरावाला आज मान्यता देण्यात आली आहे. (वाचा - Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज सर्वाधिक 139 जणांचा कोरोनामुळे बळी; दिवसभरात 2436 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)
दरम्यान, आषाढी एकादशीच्या पूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप होणार आहे. याअगोदर 2005 आणि 2012 साली श्रीविठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेपाची प्रक्रिया पार पडली होती. वज्रलेपामुळे मूर्तीचे संवर्धन होते.
पुरातत्व विभागाने दिलेल्या सुचनानुसार, दर पाच वर्षांनी व्रजलेप देण्यात यायला हवा. मात्र, या सुचनांकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. विठ्ठल मंदिर समितीच्या माध्यमातून विधी व न्याय खात्याकडे विठ्ठलमूर्तीला वज्रलेप करण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे येत्या आषाढी एकादशी अगोदर विठ्ठल मूर्तीवर वज्रलेप करण्यात येणार आहे.