IPL Auction 2025 Live

Gokul Dudh Sangh Kolhapur: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड

ही सत्ता अनेक प्रयत्न करुनही विरोधकांना उलथवून लावता आली नव्हती. या वेळी मात्र विरोधकांना हे शक्य झाले. विरोधकांची सत्ता आणण्यात आणि महाडिक गटाच्या सत्तेला सुरुंग लावण्यात विश्वास पाटील यांचा मोठा हात होता.

Kolhapur Gokul Dudh Sangh | (File Photo)

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक (Gokul Election 2021)नुकतीच पार पडली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असे वाटले होते. परंतू, गेली जवळपास तीन दशकं गोकुळवर असलेली महाडीक गटाची सत्ता उलथवून टाकत सतेज पाटील (Satej Patil) आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrifs) यांच्या शाहू परिवर्तन आघाडी (Shahu Parivartan Aaghadi)) पॅनलने गोकुळ ताब्यात घेतला. त्यांनतर आता गोकुळच्या अध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होते याबाबत उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली असून विश्वास पाटील (Vishwas Patil ) यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. विश्वास पाटील हे गोकूळचे ज्येष्ठ आणि अनुभवी संचालक म्हणून ओळखले जातात. या आधी ते महाडीक गटासोबत होते. परंतू, निवडणुकीच्या काही दिवस आगोदर त्यांनी सतेज पाटील गटात प्रवेश केला आणि गोकुळमध्ये सत्तांतरही झाले. या सत्तांतराचे बक्षिस म्हणजे विश्वास पाटील यांची गोकुळच्या अध्यक्ष पाटील (Vishwas Patil Gokul Chairman) पदावर निवड असे मानले जात आहे.

गोकुळ दूध संघावर गेली तीन दशके महाडिक गटाची सत्ता होती. ही सत्ता अनेक प्रयत्न करुनही विरोधकांना उलथवून लावता आली नव्हती. या वेळी मात्र विरोधकांना हे शक्य झाले. विरोधकांची सत्ता आणण्यात आणि महाडिक गटाच्या सत्तेला सुरुंग लावण्यात विश्वास पाटील यांचा मोठा हात होता. विश्वास पाटील यांना सोबत घेण्यासाठी सतेज पाटील गटाकडून गेले बरेच दिवस प्रयत्न सुरु होते. अखेर विश्वास पाटील सतेज पाटील गटासोबत आले आणि परिवर्तन घडले.

गोकुळ दूध संघ निवडणूक निकाल 2021

दरम्यान, गोकूळच्या अध्यक्ष पदासाठी अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात मोठी रस्सीखेच होती. अरुण डोंगळे हे या आधीही गोकुळचे अध्यक्ष राहिले आहेत. मात्र, अखेरच्या क्षणी विश्वास पाटील यांच्या नावाला सर्वांची पसंती मिळाली आणि अध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. गोकुळ दूध संघ अध्यक्ष पदाची निवडणूक ही गोकुळ शिरगाव एमआयडीसी कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी झालेल्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.