Pune Porsche Car Accident: पोर्शे कारच्या अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल यांना अटक, संभाजीनगर येथून घेतेले ताब्यात
त्यामुळे दोन निष्पापांचा जागीच बळी गेला होता. अपघातानंतर पुणे पोलिसांनी या गुन्ह्यांची तपासणी सुरु आहे.
Pune Porsche Car Accident: पुण्यातील कल्याणी नगर (Kalyaninagar) परिसरात सोमवारी निष्काळजीपणामुळे पोर्शे कारने दुचाकीस्वाराला चिरडले (Hit And Run Accident). त्यामुळे दोन निष्पापांचा जागीच बळी गेला होता. अपघातानंतर पुणे पोलिसांनी या गुन्ह्यांची तपासणी सुरु आहे. अल्पवयीन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी पुणे पोलिसांनी आरोपी वेंदात अग्रवाल याला अटक करण्यात आले. गुन्हा दाखल होताच, आरोपीचे वडिल फरार झाले होते. पुणे पोलिसांनी या प्रकरणात आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई सुरु केली. (हेही वाचा- आलिशान पोर्शे कार लोकांनाच चिरडतानाचा पुणे येथील व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल होताच, पोलिस यंत्राना कामाला लागली. फरार आरोपीला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी पथक रवाना केले होते. संभाजीनगर येथून पुणे पोलिसांनी आरोपी विशाल अग्रवाल यांना आज पहाटे अटक केले आहे. आज दुपार पर्यंत विशाल यांना पुण्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
आज न्यायालयात काय निकाल लागेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. वेंदातला वाचवण्यासाठी एकीकडून प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. बड्या बापाचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यात येत आहे. विशाल अग्रवाल यांनी मुलाला विनापरवाना पोर्शे कार चालवण्यास दिली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढं नाही तर आरोपी चालक हा अल्पवयीन असून त्याला कार चालवण्यास परवानगी दिली. या प्रकरणी वेंदातला दारू देणाऱ्या दोन पबवर कारवाई करण्यात येणार आहे.