Virar Suicide News: आधी नस कापली मग गळफास घेतली राहत्या घरी तरुणाची आत्महत्या, विरारमधील खळबळजनक घटना

कर्जाच्या त्रासाने विरारमधील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Virar Suicide News: आधी नस कापली मग गळफास घेतली राहत्या घरी तरुणाची आत्महत्या, विरारमधील खळबळजनक घटना
Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Virar Suicide News:  विरारमध्ये  (Virar) एका तरुणाने राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. २७ वर्षाच्या तरुणाने भयंकर प्रकरे आपलं जीवन संपवले आहे. विरार पूर्व विवा जाहागीड कॉम्प्लेक्स ओम वरदलक्ष्मी सोसायटीच्या बी विंगमध्ये राहणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली. सांयकाळी सातच्या सुमारास त्याने आत्महत्या केली. सुरेश कार्नकांती असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव होते. तो पेशाने दुचाकी वाहनांचा मेकॅनिक होता.

सुरेश कर्नाकांतीने सांयकाळी बाथरुममध्ये जाऊन डाव्या हाताची नस कापली त्यानंतर त्याने बेडरुममध्ये गळफास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेशला कर्ज असल्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. कर्जाच्या डिप्रेशनमध्ये येवून त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला. मृतदेह ताब्यात घेवून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

विरार पोलीसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.  या घटनेअंतर्गत पोलीसांनी कंबर कसून चौकशी सुरु केली आहे. कुटूंब, मित्र परिवार, आणि इतर संबधित व्यक्तीशीं चौकशी करण्यात येणार आहे.  h

(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2023 09:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).