मुंबई: उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे याला वांद्रे कोर्टाकडून जामीन मंजूर
संपूर्ण देशात लॉकडाउन (Lockdown) असताना 14 एप्रिल रोजी वांद्रे स्टेशनवर (Bandra Railway Station) गर्दी जमवण्यास कारण असल्याच्या आरोपाखाली उत्तरभारतीय महापंचायत संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे (Vinay Dubey) याला रबाळे पोलिसांनी अटक करून बांद्रा पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
संपूर्ण देशात लॉकडाउन (Lockdown) असताना 14 एप्रिल रोजी वांद्रे स्टेशनवर (Bandra Railway Station) गर्दी जमवण्यास कारण असल्याच्या आरोपाखाली उत्तरभारतीय महापंचायत संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे (Vinay Dubey) याला रबाळे पोलिसांनी अटक करून बांद्रा पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तसेच त्याला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, वांद्रे कोर्टोकडून (Bandra Court) त्याला जामीन मंजूर करण्यात आली असून 15 हजारांच्या वयैक्तिक बॉन्डवर त्याची सुटका केली आहे. विनय दुबेचा गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओत त्यांने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषीत केलेल्या लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. तसेच विनय दुबे हा परप्रांतीयांना या व्हिडिओच्या माध्यमातून भडकवत असल्याचे दिसून आले होते. यामुळे त्याला अटक करण्यात आली होती.
विनय दुबेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विनय दुबे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनविरोधात परप्रातीयांना भडकवत असल्याचे समजत आहे. हा व्हिडीओ फेसबुकवर शनिवारी 11 एप्रिल रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडीओत विनय दुबे परप्रांतीयांना सोबत घेऊन आपण उत्तर प्रदेशपर्यंत पदयात्रा काढणार असल्याचे सांगत होता. यावेळी त्याने आपल्याला पाठिंबा असणाऱ्यांना व्हॉट्सअपला मेजेस टाकावा, असे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा यावेळी त्याने विरोध केला. जर हे प्रकरण 14-15 एप्रिलपर्यंत मिटले नाही तर, 20 एप्रिलला पदयात्रेला सुरुवात करुन अशी धमकी त्याने व्हिडीओत दिली होती. हे देखील वाचा- महाराष्ट्रात सद्य स्थितीत Coronavirus बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर
एएनआयचे ट्वीट-
तसेच, भुकेने मरण्यापेक्षा व्हायरसने मेलेले चांगले असंही वारंवार तो व्हिडीओत बोलताना दिसला आहे. या सगळ्यासाठी त्याने राज्य आणि केंद्र सरकारला जबाबदार ठरवले होते. 14 एप्रिल रोजी युट्यूबवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओत विनय दुबे परप्रांतीयांना रस्त्यावर उतरा आणि लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ एकत्र येण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, केवळ मुंबईतील नव्हेतर, देशभरातील लोकांना त्यांनी रेल्वे स्थानकांजवळ एकत्र येण्यास सांगितले होते. . रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरुन केंद्र आणि राज्य सरकारांविरोधात एका आंदोलनाला सुरुवात करा, असेही तो म्हणाला होता.