विधानसभा निवडणूक 2019: मराठवाडा कोणाचा? शिवसेना-भाजप युती गड राखणार की, काँग्रेस रष्ट्रवादी पुन्हा एकदा भाकरी फिरवणार?

त्यामुळे सर्वच पक्षांनी इथे जोर लावलेला पाहायला मिळतो. राजकीय रणधुमाळीत कसे आहे मराठवाड्याचे चित्र यावर टाकलेला हा एक कटाक्ष.

Marathwada Political | (Photo credit: Archived, edited, representative images)

Vidhan Sabha Election 2019: विधानसभा निवडणूक 2019 ही काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena)-भाजप (BJP) युतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशभरात भाजपने मारलेली मुसंडी महाराष्ट्रातही कायम ठेवण्यासाठी युतीसाठी आणि गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी आघाडीसाठी या निवडणूका महत्त्वाच्या आहेत. अशात मराठवाडा (Maharashtra) या निवडणूकीत काय भुमिका घेणार हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या प्रदेशानंतर सर्वाधिक म्हणजेच 46 जागा या महाठवाड्यातून येतात. मराठवाड्यातील 46 जागा सत्तेचा सुकाणू कोणाच्या हाती द्यायचा हे ठरवत असतात. त्यामुळे सर्वच पक्षांनी इथे जोर लावलेला पाहायला मिळतो. राजकीय रणधुमाळीत कसे आहे मराठवाड्याचे चित्र यावर टाकलेला हा एक कटाक्ष.

मराठवाडा हा तसा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 1994 (14 जानेवारी) मध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला. तेव्हापासून मडाठवाड्याने काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून काहीसे फटकून राहायला सुरुवात केली. इथे शिवसेना आणि काही प्रमाणात भाजपने आपली व्याप्ती वाढविण्यास सुरुवात केली. तरीही काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथे बलस्थान मोठे होते. मात्र, विधानसभा निवडणूक 2014 मध्ये या बलस्थानाला धक्का लागला. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस केवळ 17 जागांवर अटकली. तर, शिवसेना-भाजप युती तब्बल 26 जागांवर पोहोचली.

एकेकाळी हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा हा एक ऐतिहासिक प्रदेश राहिला आहे. या प्रदेशातील राजकारणाला सांस्कृती, धार्मिक आणि जातीय बाज पाहायला मिळतो. हैदराबाद मुक्ती संग्रामाची पार्श्वभूमी लाभल्याने या प्रदेशावर काँग्रेसी विचारांचा प्रभाव दीर्घकाळ होता. मराठवाड्याने शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवाजी पाटिल निलंगेकर आणि अशोक चव्हाण यांच्या रुपात महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री आणि अनेक नेते दिले आहेत.

मराठवाड्यात काट्याची टक्कर असणाऱ्या प्रमुख लढती

बहिण विरुद्ध भाऊ

भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यातील सामना हा मराठवाड्याच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण लढत आहे. दोघेही बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. दोघेही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मंडे यांच्या राजकीय मार्गदर्शनाखाली वाढले आहेत. 2014 च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पंकजा मुंडे या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. परळीतील जनता कोणाला साथ देते पाहणे उत्सुकतेचे आहे.

काका विरुद्ध पुतण्या

मराठवाड्यात बहिण-भावाच्या लढाईसोबतच काका-पुतण्या यांच्यातील लढाईही संघर्षमय ठरत आहे. बीड जिल्ह्यात एकेकाळचे शरद पवार यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजप प्रवेस केला. आता ते भाजप तिकीटावर उमेदवारी करत आहेत. दुसऱ्या बाजूला जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे पुतने संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काका जयदत्त क्षीरसागर विरुद्ध पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यातील लढाई लक्षवेधी ठरली आहे.

मधुकरराव चव्हाण विरुद्ध राजाण जगजितसिंह

मराठवाड्यत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील लढतही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. इथे काँग्रेस पक्षाचे मधुकरराव चव्हाण रिंगणात आहेत. भाजपने इथे पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मधुकरराव हे 1999 पासून गेली चार वर्षे सलग निवडूण आले आहेत. आता या दोन दिग्गजांमध्ये रंगलेल्या सामन्यत जनता कोणाला साथ देते हे पाहणे महत्त्वाचे.

विलासराव देशमुख पर्यायाने काँग्रेसच्या गडात काय होणार?

लातूर हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र. राज्याचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या रुपाने इथे सत्ताकेंद्र निर्माण झाले होते. 2014 च्या लोकसभा, विधानसभा आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने या सत्ता केंद्राला मोठा धक्का दिला. लोकसभा निवडणूकीत लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर या सहाही मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळाली. त्यामुळे आता विधानसभा निवडणूकीत मागच्या वेळी जिंकलेल्या 3 जागा टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर असणार आहे.

अशोक चव्हाण यांना पुनर्भरारीची संधी

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये नांदेड येथून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पुन्हा रिंगणात आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असली तरी, त्यांच्यासाठी ही पुनर्भरारीची संधीही असणार आहे.

मराठवाड्यातील महत्त्वाचे मुद्दे

दरम्यान, दुष्काळ, शेती, पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण, नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न, विदर्भ-कोकण-पश्चिम महाराष्ट्र आदी प्रदेशांच्या तुलनेत मराठवाड्याचा कमी असलेला विकास यांसह इतरही अनेक मुद्दे मराठाड्यातील राजकारणात प्रभावी ठरताना दिसतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif