Vasai News: वसईत ब्लॅकमेलिंगला कंटाळून बापलेकाने उचलेले टोकाचे पाऊल, आरोपींवर गुन्हा दाखल, मनसेच्या पदाधिकाऱ्याला अटक

या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Vasai News: वसईत (Vasai) धमकीला कंटाळून बाप लेकाने टोकाचं पाऊल उचलले आहे. जमिनीच्या वादावरून दोघांने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राहत्या घरी दोघांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे.ऍडविन डिसोझा (वय 59) आणि कुणाल डिसोझा ( वय 27) असे आत्महत्या केलेल्या बापलेकाचे नाव आहे.  वसई पोलीसांनी दोघांच्या मृत्यूची नोंद घेतली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी दोघांनी सुसाइट नोट लिहिल्या होत्या.

पोलीसांनी या नोट ताब्यात घेतल्या. त्यात असं लिहलं होत की, जमिनीच्या वादातून ब्लॅकमेंलिंग आणि छळ होत असल्याने आम्ही आत्महत्या करत आहोत. असं पोलीसांनी सांगितले. सुसाइट नोट मध्यह वडिलांनी ८ जणांची नावे लिहली तर मुलाने ४ जणांची नावे लिहली. या घटने अंतर्गत पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन रात्री उशीरा अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेअंतर्गत पोलीसांनी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

अटक आरोपीमध्ये मनसेचा पदाधिकारी स्वप्नील डीकुन्हा आणि डॉ भूषण वर्मा यांचा समावेश आहे.  या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. ब्लॅकमेलिंग कंटाळून बाप लेकाने एकत्र आत्महत्या केली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास वसई पोलीस करत आहेत.