Vasai: फेसबुक वरील मित्राच्या नादात व्यक्तीने गमावले तब्बल 80 हजार रुपये
सोशल मीडियातील कोणत्याही अज्ञात व्यक्तीला आपला मित्र बनवण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणे अत्यावश्यक असते अशा सुचना वेळोवेळी दिल्या जातात.
सोशल मीडियातील कोणत्याही अज्ञात व्यक्तीला आपला मित्र बनवण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणे अत्यावश्यक असते अशा सुचना वेळोवेळी दिल्या जातात. तरीही लोक अशा मित्रांना आपल्या फेसबुकवर अॅड करुन त्यांच्याशी मैत्री करतात. या पद्धतीने केलेली मित्र कधीही अंगलट येऊ शकते आणि त्या संदर्भातील घटना सुद्धा समोर आल्या आहेत. याच दरम्यान आता वसई येथील नागरिकाने फेसबुक फ्रेंडच्या नादात तब्बल 80 हजार रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. तर आरोपीने व्यक्तीकडे त्याला 15 हजार रुपयांची तातडीने गरज असल्याचे म्हटले खरे पण त्याला 80 हजार रुपयांना चुना लावला गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय व्यक्ती फेसबुक वरील आपल्या खोट्या मित्रासोबत बोलत होता. त्यावेळी आरोपीने व्यक्तीकडे 15 हजार रुपयांची गरज असल्याचे सांगत पैशाची मागणी केली. पीडित व्यक्तीने ही कोणताच विचार न करता त्याला ई-वॉलेटच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले असता ते झाले नाही. त्यावेळी आरोपीने व्यक्तीला त्याच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक आणि ओटीपीची सुद्धा विचारणा केली. तेव्हा सुद्धा व्यक्तीने त्याला अगदी सहजपणे ही सर्व माहिती दिली. एका मिनिटातच व्यक्तीच्या अकाउंटमधून 80 हजार रुपये डेबिट झाले.(Sniffing Out Criminals: महाराष्ट्र पोलिसांच्या स्निफर डॉगची मोठी कामगिरी; 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला झटक्यात शोधले)
पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारे एखाद्या अज्ञात व्यक्तीला वैयक्तिक किंवा बँक खात्यासंबंधित माहिती देऊ नये असे आवाहन केले आहे.