वसई: 69 वर्षीय महिलेला स्कॉटिश पायलट सोबतची मैत्री पडली महागात, गमावले तब्बल 57 लाख रुपये

या मैत्रिच्या नादात महिलेने तब्बल लाखो रुपये गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबईतील वसई (Vasai) येथे राहणाऱ्या एका 69 वर्षीय महिलेची सोशल मीडियात एका व्यक्तीसोबत गेल्या महिन्यातच मैत्री झाली. या मैत्रिच्या नादात महिलेने तब्बल लाखो रुपये गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर पीडित महिलेले सोशल मीडियात मैत्री झालेल्या व्यक्तीला RTGS माध्यमातून 57 लाख रुपये ट्रान्सफर केले. हे ट्रानझॅक्शन 9 ते 23 जुन दरम्यान झाले. यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर तिने बुधवारी वसईगाव पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

लिओ जॅकब अशी आरोपीची ओळख पटली आहे. लिओ याने महिलेला फेसबुकच्या माध्यमातून फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तिने एक्ससेप्ट सुद्धा केली. लिओ याने त्याची ओळख करुन देत तो स्कॉटलंड येथील रहिवाशी असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायलट असल्याचे महिलेला सांगितले.(धक्कादायक! कोरोना व्हायरस औषध Remdesivir चा काळा बाजार; 30,000 ते 40,000 हजार प्रती कुपी दराने होत आहे विक्री- Report)

महिलेने पुढे असे म्हटले आहे की, आरोपीने वसईत एका जागा घेऊन तेथे इंडस्ट्री सेटअप करण्याबाबत सांगितले. यावर महिलेने त्याला मदत करेन असे सांगत गावात झिरो डाऊन पेमेंटवर जागा मिळवून देईन असे ही म्हटले. यावर आरोपीने महिलेला तिच्या नावाने जागा घेण्यास सांगितले. या जागेवर आपण फॅक्टरी सुरु करु असे ही म्हटले. आणखी एक आरोपी त्याची ओळख जोशीला अशी पटली असून त्याने फॅक्टरी सुरु करण्याबाबत होकार दिला होता.(धक्कादायक! पोलिओची लस दिल्यानंतर सात महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू; पालघर जिल्ह्यातील घटना)

या दोन्ही व्यक्तींनी महिलेला जागेचे पैसे कुरियरच्या माध्यमातून पाठवतो असे सांगितले. पीडित महिलेचा नवरा हा निवृत्त शासकीय कर्मचारी असून त्याला पैसे ट्रान्सफर बाबत माहिती होती. परंतु त्यांनी सावधगिरी बाळगली नाही. काही दिवसांनंतर आरोपींनी महिलेकडे पैशांची मागणी करत सरकारी टॅक्स भरायचे असल्याचे म्हटले. यावर महिलेने कोणताच विचार न करता आरोपींना पैसे पाठवून दिले. महिलेने या व्यक्तींना फोन केला असता त्यांचा फोन लागला नाही. यावर महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या आरोपींच्या विरोधात कलम 420, 406 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.