Vaishnavi Hagawane Death Case: गृहविभागाचा IG जालिंदर सुपेकर यांना दणका; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला

जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजीनगर , नाशिक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

Jalindar Supekar | X@DrAaditya_dntst

पुण्यामधील कथित वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी गृहविभागाने विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर (Special inspector general (prisons)) यांचं नाव आल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. सुपेकर यांच्याकडे नाशिक, संभाजीनगर, नागपूर कारागृह उपनिरीक्षक पदाचा कार्यभार होता तो आता काढण्यात आला आहे. वैष्णवी च्या मृत्यूप्रकरणी तिचे सासू सासरे, नणंद आणि दीर, पती सध्या पोलिस कोठडीत आहेत. जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंबाचे नातेवाईक आहेत. मामेसासरे सुपेकर यांनी आरोपींना मदत केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर आता कारवाई केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकरांविरूद्धचे काही पुरावे समोर आणल्यानंतर आणि आज वैष्णवींच्या वडिलांनीही आरोप केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

500 कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी सुपेकरांवर खटला सुरू असल्याची बाब अंजली दमानिया यांनी समोर आणली आहे तसेच, वैष्णवी प्रकरणात हगवणे यांच्याकडून जालिंदर सुपेकर यांच्या नावाने धमकी देत कस्पटे कुटुंबीयांवर व पोलिसांवर दबाव टाकल्याचेही समोर आले आहे.

जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजीनगर , नाशिक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदाचा नियमित कार्यभार आणि कारागृह विभागातील “कारागृह उप महानिरीक्षक याची पाच पदांपैकी रिक्त असलेल्या तीन पदांचा (नाशिक विभाग, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर अतिरिक्त कार्यभार होता. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 'नववधूंना' केलं हे आवाहन; हुंडा, कौटुंबिक अत्याचारामध्ये लक्षात ठेवा या गोष्टी.

जालिंदर यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून त्याजागी कारागृह उप महानिरीक्षक, पूर्व विभाग, नागपूर - स्वाती साठे, कारागृह उप महानिरीक्षक, नाशिक विभाग, नाशिक चा कारभार अरुणा मुगुटराव आणि कारागृह उप महानिरीक्षक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर हा वैभव आगे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement