Ajit Pawar On Ultimatum: महाराष्ट्रात अल्टीमेटम, हुकुमशाही चालणार नाही; अजीत पवार यांचा स्पष्ट इशारा
महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे. जे करायचे ते कायद्याला धरुन करायला हवे. उगाच कोणीतरी अल्टीमेटम (Ultimatum) देण्याची गरज नाही.
राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत अल्टीमेटम देणाऱ्या मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना उपमुख्यमत्री अजित पवार यांनी चांगलेच खडसावले आहे. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे. जे करायचे ते कायद्याला धरुन करायला हवे. उगाच कोणीतरी अल्टीमेटम (Ultimatum) देण्याची गरज नाही. असले अल्टीमेटम, हुकूमशाही (Dictatorship) महाराष्ट्रात चालणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते. राज्यात सर्व कायदे, नियम सर्वांना सारखेच असतील. त्यात कोणताही वेगळा विचार केला जाणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.
राज ठाकरे हे कोणत्या काळात बोलतात त्यावर त्यांच्या भाषणाचा सूर अवलंबून असतो, अशी टीकाही अजित पवार यांनी या वेळी केली. जर कोणाला असे वाटत असेल की जसे माझ्या मनात आहे तसे घडेल. तर महाराष्ट्रात ते शक्य नाही. उगाच काहीतरी वेगळी भूमिका घेऊन हुकूमशाही वर्तन करण्याचा प्रयत्न करु नये. इथे कोणताही अल्टीमेटम चालणार नाही. जर कोणाला अल्टीमेटम द्यायचाच असेल तर ते आपापल्या घरातमध्ये देऊ शकता, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. (हेही वाचा, Loudspeaker Row In Maharashtra: मनसे नेते संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल, शोध सुरु)
महाराष्ट्रात राज ठाकरे हे कोणत्या काळात बोलतात त्यावरत्यांच्या भाषणाचा सूर अवलंबून असतो. लोकसभा निवडणूक 2019 पूर्वी त्यांची भाषणे पाहा. ते भाजप विरोधात बोलत होते. पुढील काळात त्यांचे मनतपरिवर्तन झाले. आता ते शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकासआघाडी विरोधात बोलतात,असे अजित पवार यांनी या वेळी म्हटले. कोणत्याही एका राज्यात वेगळा कायदा राबवू नये. भोंग्यांचा प्रश्न हा देशभरातील आहे. त्यामुळे केंद्रानेच सर्वराज्यांबाबत एक भूमिका घ्यायला हवी, असेही अजित पवार म्हणाले.