मेट्रोला नाही तर, आरे कारशेडच्या कामाला स्थगिती- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नुकतीच त्यांची मुंबई येथे पत्रकार परिषद पार पडली.

Uddhav Thackeray | (Photo Credit: File Photo)

महाराष्ट्राला (Maharashtra) नवे सरकार मिळाले असून मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विराजमान झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नुकतीच त्यांची मुंबई येथे पत्रकार परिषद पार पडली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. "आमचा मेट्रोला नाही तर, आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. आरे येथील कारशेडच्या कामामुळे निसर्गाला धोका निर्माण झाला आहे. तसेच रातोरात हजारो झाडांची कत्तल करणे आम्हाला मंजूर नाही", असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. नुकतीच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देऊन उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण प्रेमींचे मन जिंकली आहेत. मेट्रोच्या कारशेडसाठी अनेक झाडांची हत्या करण्यात आली होती. नैसर्गाला हानी पोहचवू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली आहे. आमचा विकासाच्या कामाला नाहीतर, आरेतील मेट्रो कारशेडला विरोध आहे. ज्यामुळे निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महत्वाचे म्हणजे, मेट्रोच्या कामासाठी रातोरात हजारो झाडांची कत्तल करण्यात आली ते आम्हाला मंजूर नाही, असे उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयात स्वीकारणार पदभार

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, सरकार केवळ घोषणाबाजी करते. परंतु, त्या कामाची अंबलबजावणी केली जात नाही, असे बोलत उद्धव ठाकरे यांनी याआधीच्या सरकारवर निशाणा साधला आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाचे पालन केले जाणार आहे. असे अश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.