उद्धव ठाकरे उद्याच घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ; राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री-सूत्र

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा स्वीकार करण्यास तयार असल्याचा दावा शिवसेना आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आजच केला होता.

Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo Credit: You Tube)

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस (Shiv Sena-Nationalist Congress-Congress) या  महाविकासआघाडी सरकारमध्ये एक मुख्यमंत्री (Chief Minister) तर दोन उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)  असणार आहेत. या सरकारमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील (Jayant Patil,) आणि काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)  हे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा मुख्यंमत्री म्हणून शपतविधी उद्या (बुधवार, 27 नोव्हेंबर 2019) पारपडणार आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

राज्याच्या आजवरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दोन उप-मुख्यमंत्री पदं पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा स्वीकार करण्यास तयार असल्याचा दावा शिवसेना आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आजच केला होता.  दरम्यान, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा स्वीकार करणार असल्याची बातमी पुढे येताच 'हिच ती वेळ' असे म्हणत शिवसेनेने वेळ साधली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान, आकड्यांचा खेळ विचारात घेता शिवसेना (56) विधानसभा सदस्यसंख्येच्या तुलनेतर राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाची विधानसभा सदस्यसंख्या (54) केवळ दोननेच कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री पदावर दाव सांगेल. तसेच, अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतले जाईल, असे बोलले जात होते. मात्र, सूत्रांच्या हवाल्यने प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्री पदावर राहतील असे दिसते. (हेही वाचा, भाजपकडे पुरेसे बहुमत नाही, राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार: देवेंद्र फडणवीस)

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष आणि राज्यातील नव्या राजकीय समिकरणाचे सूत्रधार शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची एक बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.