Covid-19 Vaccination for College Students: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवणार- उदय सामंत

मात्र त्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. तसंच लसींचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांनाच केवळ महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे.

Uday Samant | (Photo Credits: Twitter)

कोविड-19 संकटामुळे (Covid-19 Pandemic) बंद असलेली राज्यभरातील महाविद्यालयं (Colleges) कालपासून (बुधवार, 20 ऑक्टोबर) पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र त्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. तसंच लसींचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांनाच केवळ महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. यासबंधिची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Higher & Technical Education Minister Uday Samant) यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबवली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, सध्या कोरोनाची दुसरी लाट ओरसली असली तरी काही प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील कोरोनाची भीती काढण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुक्तपणे वावरता येण्यासाठी संपूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर लसीकरण होऊनही काही विद्यार्थ्यांना लोकल प्रवासादरम्यान अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवल्यावर तिकीट द्यावे, अशी मागणी करणारे पत्र आम्ही मुख्य सचिवांना दिले आहे. ही समस्या येत्या दोन-तीन दिवसात मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Colleges Reopen: 20 ऑक्टोबर पासून महाविद्यालयं होणार सुरु; मुंबई विद्यापीठाने जारी केल्या SOP's)

दरम्यान, महाविद्यालयं सुरु केली असली तरी लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. तसंच 50 टक्के क्षमतेने  विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार असून टप्प्याटप्प्याने वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहेत.