Nandurbar Suicide News: दोन तरुणांची तापी नदी उडी मारून आत्महत्या, नंदूरबार जिल्हा हादरला
तापी नदीत दोन तरुणांनी एकाच दिवशी उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
Nandurbar Suicide News: तापी नदीत दोन तरुणांनी एकाच दिवशी उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दोन वेगवेगळ्या घटना आहेत मात्र दोघांन्ही एकाच जागेवरून उडी मारून आत्महत्या केली अशी माहिती समोर येत आहे. ही घटना नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील आहे. दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने गावात पुल परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा- पुण्यातील पोलिसाची ड्युटीवर असताना स्वत:वर गोळी घालून आत्महत्या,
मिळालेल्या माहितीनुसार, नंदूबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील दोन तरुणांनी एकाच जागेवरून तापी नदी उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्याचे माहिती कुटुंबियांना मिळताच घटनास्थळी धाव घेतला. घटनेची माहिती पोलिसांना सांगण्यात आली. सारंगखेडा येथील तापी पूल हा सुसाईट पॉईंट झाल्याची गावकरी चर्चा करत आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली.
पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी बचावकार्य सुरु करत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करणारे दोन तरुण कोण आहे त्यांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सुरु केला आहे. गावात आत्महत्येनंतर विविध चर्चा सुरु आहे. दोघांची ओळख ही अद्याप पटली नाही.
(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2024 11:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

