ughing-after-seeing-panipuri-bhaiyas-style-watch-the-viral-video-549064.html" title="Viral Video: पाणीपुरी वाल्या भैयाची स्टाइल पाहून नेटकऱ्यांना हसु आवरेना, अहमदाबादचा व्हिडिओ व्हायरल">Viral Video: पाणीपुरी वाल्या भैयाची स्टाइल पाहून नेटकऱ्यांना हसु आवरेना, अहमदाबादचा व्हिडिओ व्हायरल
 • Diesel Paratha Viral Video: "डिझेल पराठा" असे काही नाही, मनोरंजनासाठी बनवला होता व्हिडीओ, हॉटेल चालकने दिली माहिती
 • Desi Jugaad Viral Video: कडक उन्हात पाणी थंड करण्यासाठी महिलेने केला देसी जुगाड, व्हिडीओ पाहून व्हाल चकित
 • Close
  Search

  Pune Police Suicide: पुण्यातील पोलिसाची ड्युटीवर असताना स्वत:वर गोळी घालून आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

  पुण्यात एका पोलिस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

  महाराष्ट्र Pooja Chavan|
  Pune Police Suicide: पुण्यातील पोलिसाची ड्युटीवर असताना स्वत:वर गोळी घालून आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
  Pune Police Suicide PC TWITTER

  Pune Police Suicide: पुण्यात एका पोलिस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. भारत दत्ता अस्मार असं पोलिसांचे नाव आहे. शुक्रवारी ही घटना घडली. भरत हे खडक पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोहिया नगर पोलिस चौकीत रात्रीच्या ड्युटीवर असताना आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. गेल्या महिन्यात मुंबईतील सांताक्रुझ येथे एका पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती. (हेही वाचा- आईच्या प्रियकराची हत्या, मुंबईतील तरुणास जन्मठेप

  मिळालेल्या माहितीनुसार, भारत दत्ता अस्मार रोज प्रमाणे रात्रीच्या ड्युडीला आले हजेरी लावली आणि त्यानंतर आराम करण्यासाठी रेस्ट रुममध्ये गेले. थोड्यावेळाने रेस्टरुममधून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे पोलिस ठाण्यात उपस्थित वरिष्ठ पोलिस धावत पळत रुममध्ये गेले. तेथे भारत यांनी स्वत:वर गोळी झाडली होती. ते रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ माजली होती.

  इतर पोलिसांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले,परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती भारत यांच्या कुटुंबियाना देण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर भारत यांच्या कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. भारत यांनी आत्महत्या का केली याची चौकशी सुरु आहे. त्यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप समोर आले नाही.

  शहर पेट्रोल डीझल
  कोल्हापूर 106.06 92.61
  मुंबई 106.31 94.27
  नागपूर 106.63 93.16
  पुणे 106.42 92.92
  View all
  Currency Price Change
  Close
  Latestly whatsapp channel