#Video: कल्याण मध्ये भर रस्त्यात आढळला दोन तोंडाचा घोणस साप
हरीश जाधव आणि संदीप पंडित या स्थानिक तरुणांना Russell's Viper म्हणजेच घोणस या प्रजातीचा दुर्मिळ साप दिसून आला.
गुरुवारी, (19 सप्टेंबर) रोजी कल्याण (Kalyan) येथे रौनक सिटी (Raunaq City) लगतच्या परिसरात दोन तोंडाचा एक दुर्मिळ विषारी साप आढळला आहे. हरीश जाधव आणि संदीप पंडित या स्थानिक तरुणांना Russell's Viper म्हणजेच घोणस (Ghonas) या प्रजातीचा दुर्मिळ साप दिसून आला. याबाबत वन्य प्राणी कल्याण गटाला माहिती देताच अधिकारी योगेश कांबळी व दत्ता बोंबे यांनी याठिकाणी दाखल झाले . भर रस्त्यात हा साप फिरत असताना या संघटनेच्या सर्पमित्रांकडून सापाला पकडण्यात आले व वन परिक्षेत्रे विभागाच्या अधिकारी कल्पना वाघेरे यांच्याकडे सोपवण्यात आले. प्राणीतज्ञ धर्मा रायबोळे यांच्याकडून या सापाची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये सापाचे स्वास्थ्य उत्तम असल्याचे समजत आहे. या सापाचा रस्त्यावर फिरत असतानाच एक व्हिडीओ सध्या सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
यापूर्वी 2018 साली नवी मुंबई येथील खारघर परिसरात देखील Russell's Viper या प्रजातीचा एक दोन फूट लांब साप दुकानाच्या कपाटातील खणात आढळला होता. यावेळी प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेतर्फे सापाला पकडण्यात आले होते. साधारणतः पावसाळयाच्या काळात या प्रजातीचे लहान साप आजूबाजूच्या परिसरात आणि त्यातही विशेषतः मानवी वस्तीत शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात, असे पशुवैद्य धर्मा रायबोले यांनी सांगितले आहे.
पहा दुतोंडी घोणस साप (Watch Video)
याआधी व्हर्जिनिया मध्ये देखील अशाच प्रकारचा एक दुतोंडी साप आढळला होता. हे सापअशा अतिशय दुर्मिळ असतात. त्यामुळे त्यांचे जन्माला येण्याचे प्रमाण अगदीच नगण्य असते. तसेच ,अशा सापांना पर्यावरणाशी जोडून घेता येत नाही. जगत असताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे ते अल्पावधीत मृत्यू पावतात, असे सर्पतज्ज्ञ जे.डी. क्लिओफर यांनी सांगितले होते.