Chandrapur Flood: विदर्भातील वर्धा नदीला पूर, वर्धा नदीच्या काठावरील नागरिकांना सर्तकेचा इशारा

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने वर्धा आणि चंद्रपुरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Flood | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Chandrapur Flood:  राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं मुंबई, कोकणासह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अनेक नद्या दुथडी भरून वाहतात. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाड्यात सुध्या पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे एकीकडे शेतकरी त्रस्त झाला आहे आणि दुसरी कडे काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.  कोकणासह विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाने हैराण करून सोडलं आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. सखल भागात देखील पाणी साचलं तर मुसळधार पावसामुळे वाहतूकीवर परिणाम झाले आहे.

परिणामी वर्धा नदीला पूर आला असून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थिती मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास २० रस्ते बंद झाले आहे. याशिवाय अनेक गावं  पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. त्यानंतर आता वर्धा नदीकिनारी असलेल्या ३४ गावांना सावधानतेचा इशारा प्रशासना कडून देण्यात आला आहे. खबरदारी  म्हणून शासनाकडून सुमारे ३३० स्थानिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं  आहे. येलमपल्ली धरणाचे ६२ पैकी ४८ दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

विदर्भात मुसळधार पावसाची बॅंटीग चालू असल्यामुळे वर्धा नदीला पूर आले आहे.  चंद्रपूर-राजुरा, घुगुस-चंद्रपूर आणि वरोरा-वणी-यवतमाळ हे मार्ग बंद झाले आहे. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येलमपल्ली धरणाचे ६२ पैकी ४८ दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासन खबरदारी म्हणून योग्य ती काळजी घेण्यास सांगत आहे. वर्धा नदी काढी वसलेल्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now