Ahmednagar News: अहमदनगर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्सची पिकअपला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

तर पिकअप वाहनातील अकरा जण जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यात ट्रॅव्हल्सने पिकअप वाहनाला धडक दिली.

Accident (PC - File Photo)

अहमदनगर-पुणे महामार्गावरील (Ahmednagar-Pune Highway)  चास शिवारात ट्रॅव्हल्सने पिकअप (Travels Pickup Accident) वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर पिकअप वाहनातील अकरा जण जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यात ट्रॅव्हल्सने पिकअप वाहनाला धडक दिली. यात दोन पुरुष व एक महिला यांचा जागीच मृत्यू (Death) झाला तर पिकअपमधील 11 जण जखमी झाले. दरम्यान या अपघातात प्रवीण गोरख कागदे, सारिका मच्छिंद्र कागदे, दीपक चव्हाण अशी मृतांची नावे आहेत. (हेही वाचा - Pune Accident: पुणे महामार्गावर भीषण अपघात, चार वाहनांचा धडकेत दोघांचा मृत्यू)

जखमींमध्ये पिकअप चालक व ट्रॅव्हल्स चालकाचाही समावेश आहे. आहे. याप्रकरणी दोन्ही वाहने अहमदनगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. दरम्यान पिकअप वाहनातुन संपूर्ण कागदे कुटुंब पुण्याहून नगरकडे येत होते. अपघात झाल्यानंतर पिकअपमधील संपूर्ण कागदे कुटुंब जखमी झाले तर याच कुटुंबातील प्रवीण गोरख कागदे व सारिका मच्छिंद्र कागदे यांचे निधन झाले आहे.

सुरज बजरंग कागदे, पिकअप चालक बजरंग शेषराव कागदे, धीरज मच्छिंद्र कागदे, मच्छिंद्र शेषराव कागदे, राहुल गोरख कागदे, सीता बजरंग कागदे, आरुषी मच्छिंद्र कागदे, आरती प्रवीण कागदे, आरती बजरंग कागदे, श्रुती मच्छिंद्र कागदे, धीरज राजाभाऊ जोगदंड हे या भीषण अपघातात जखमी झाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif