Coronavirus: नांदेडमध्ये आज 3 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
यातील 2 जण हे पंजाबवरून नांदेडमध्ये आले होते. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. याशिवाय शनिवारी नांदेड मधील गुरुद्वारा लंगर साहिब येथे राहणाऱ्या 20 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आज आणखी तीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 29 वर पोहोचली आहे.
Coronavirus: नांदेडमध्ये (Nanded) आज 3 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यातील 2 जण हे पंजाबवरून नांदेडमध्ये आले होते. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. याशिवाय शनिवारी नांदेड मधील गुरुद्वारा लंगर साहिब येथे राहणाऱ्या 20 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आज आणखी तीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 29 वर पोहोचली आहे.
नांदेडमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नांदेडकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी गुरुद्वारा लंगर साहिब येथे राहणाऱ्या 20 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. (हेही वाचा - Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण? जाणून घ्या)
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील हजूर साहिब येथून पंजाबला परत आल्यानंतर राज्यातील 137 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 29 वर पोहोचली आहे. यातील दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून 24 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.