Ahmednagar News: दलित तरुणांचे कपडे काढून झाडाला टांगून मारहाण, अहमदनगर येथील संतापजनक घटना

अहमदनगरमध्ये तीन दलित तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime | (File image)

Ahmednagar News: अहमदनगर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दलित कुटूंबातील एका मुलाला कपडे काढून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.  या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चोरीच्या संशयितामुळे तरुणाची मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक म्हणजे पीडीत व्यक्तींना कपडे काढून त्याला झाडाला बांधलं. आणि बेदम मारहाण केली. या घटनेनंतर दलित संघटनांनी हरेगाव बंद पाळत घटनेचा निषेध केला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात मोलमजुरी करून काम करणाऱ्या तीन तरुणांना लोकांकडून मारहाण केली आहे. शेळी आणि कबुतरं चोरल्याच्या संशयावरून आरोपींनी या तरुणांचे कपडे काढून त्यांना झाडाला उलटे टांगले आहे.  आणि बेदम मारहाण केली. या घटनाची माहिती मिळताच, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतला. त्या पीडीचत तरुणांना नागरिकांनी रुग्णालयात नेलं.

हरेगावात दलित तरुणांना कपडे काढून मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळताच, जिल्ह्यातील रिपब्लिकन संघटनांनी तातडीने श्रीरामपुरात धाव घेतली. त्यानंतर एक दिवस हरेगावात बंद पाळण्यात आला. या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच आरोपींना तातडीने अटक होण्याची शक्यता आहे. दलित तरुणांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

SSC Result Pass Prediction: मुलांच्या तुलनेत मुली सरस, महाराष्ट्र एसएससी निकालाचा ट्रेंड; पाठिमागील 5 वर्षांतील सरासरी उत्तीर्णतेची टक्केवारी, घ्या जाणून

Coimbatore Shocker: तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये चार अल्पवयीन मुलांसह पाच जणांचा 2 शाळकरी मुली व एका मुलावर बलात्कार; Porn पाहण्याचे लागले होते व्यसन, गुन्हा दाखल

Legends 90 League 2025 Teams and Players: शिखर धवन, हरभजन सिंग,सुरेश रैनासह अनेक दिग्गजांसोबत लेजेंड्स 90 लीगला होणार सुरूवात; संघ आणि खेळाडूंची सपूर्ण यादी पहा

Amravati Shocker: आधी लोखंडी सळ्यांचे चटके...मग लघवी पाजली, कुत्र्याची विष्ठा खायला लावली; काळी जादू केल्याच्या आरोपावरून 77 वर्षीय आदिवासी महिलेला गावकऱ्यांकडून मारहाण

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement