MNS: 'बहिरं सरकार ऐकेल का???' मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या 'त्या' तरूणाच्या व्हिडिओवर मनसेने दिली 'अशी' प्रतिक्रिया
दरम्यान, सर्व सर्वसामन्यांसाठी सुरु करण्यासाठी मुंबईची लोकल ट्रेन (Mumbai Local Trains) बंद करण्यात आली होती.
महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, सर्व सर्वसामन्यांसाठी सुरु करण्यासाठी मुंबईची लोकल ट्रेन (Mumbai Local Trains) बंद करण्यात आली होती. त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. अद्यापही सर्वसामान्य लोकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी नाही. मुंबई लोकलमधून प्रवास करता येत नसल्याने सर्वसामन्यांना किती अडचणींना सामोरे जावा लागत आहे? हे एका तरूणाने व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका तरूणाने परवानगी नसतानाही लोकलमधून प्रवास केला. परंतु, त्याला परेल स्थानकावर टीसीने पकडले. त्यानंतर त्याने व्हिडीओ करून लोकल प्रवासाच्या बंदीबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच सरकारचेही लक्ष वेधून घेतले आहे. या तरूणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक राजकीय नेत्यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. यातच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत 'बहिरं सरकार ऐकेल का?' असे कॅप्शन दिले आहे. हे देखील वाचा- Amravati Murder Case: अमरावती मध्ये शिवसेना शहरप्रमुखाची निर्घुण हत्या; डोळ्यात तिखटपूड टाकून सपासप वार
मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकलबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी त्यांनी कोरोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार नसल्याचे म्हटले होते.